गतसप्ताहाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली. अखेरच्या दिवशीदेखील निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे 22794.7 अंक व 75111.39 अंकांच्या उच्चांकी पातळीपर्यंत झेप घेतली. परंतु शुक्रवारची सकारात्मक सुरुवात दिवसभर टिकली नाही. वरच्या पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा घेऊन जाणे (profit booking) पसंत केले. शुक्रवारच्या एका दिवसात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य 2.25 लाख कोटींनी घटून 406.24 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. बाजारातील एकूण वातावरणाचे निदर्शक असलेला व्होलाटाईलिटी. इंडेक्स (व्हिक्स) 9 टक्क्यांनी वाढला. मागील 7 ट्रेडिंग सेशन्स मध्ये व्हिक्स मध्ये तब्बल 43 टक्क्यांची वाढ होऊन व्हिक्स 14.62 पर्यंत पोहोचला. बाजारमध्ये जेव्हा कधी घबराटी किंवा अनिश्चिततेचे वातावरण असते तेव्हा 'व्हिक्स' वाढतो, असे म्हटले जाते, सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे सत्र चालू असल्याने गुंतवणूकदार 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत.
गतसप्ताहात शुक्रवारच्या अखेरच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशकामध्ये अनुक्रमे एकूण 172.35 अंक व सेन्सेक्समध्ये 732.96 अंकाची घसरण होऊन, दोन्ही निर्देशांक 22475.85 अंक व 73878.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.76 टक्के, तर सेन्सेन्स 0.98 टक्क्यांच्या घसरणासह बंद झाले. एकूण सप्ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये एकूण 0.25 टक्क्यांची वाढ झाली, तर सेन्सेक्समध्ये 0.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ दर्शवणार्या समभागमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (7.2 टक्के), पॉवर ग्रीड (6.4 टक्के), ग्रासीम इंडस्ट्रीज (5.9 टक्के), कोल इंडिया (4.1 टक्के), एसबीआय (3.8 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला तर सर्वाधिक घट दर्शवणार्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेक (-8.5 टक्के), अपोलो हॉस्पिटल (-4 टक्के), कोटक महिंद्रा बँक (-3.8 टक्के), एचडीएफसी लाईफ (3.7 टक्के), भारती एअरटेल (-3.7 टक्के) यांचा समावेश झाला.
एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनात मागील वर्षाच्या तुलनेत भरघोस 12.4 टक्के वाढ झाली. जीएसटी कर संकलन प्रथमच 2 लाख कोटींचा टप्पा पार करून 2 लाख 10 हजार कोटींपर्यंत पोहोचले. स्थानिक बाजारपेठेत झालेल्या व्यवहारांमध्ये 13.4 टक्के तसेच आयातीमध्ये 8.3 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे जीएसटी कर संकलन वाढल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले. एप्रिल 2023 मध्ये जीएसटी करसंकलन 1 लाख 87 हजार कोटी रुपये होते.
देशातील महत्त्वाची दागिने आणि घड्याळे उत्पादन करणारी टाटा समूहाची कंपनी 'टायटन'चा गत आर्थिक वर्षाचा चौथ्या तिमाहीचा एकूण निव्वळ नफा 4.8 टक्के वधारून 771 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 20.6 टक्के वाढून 12494 कोटींवर गेला.
अमेरिकेचा गुंतवणूकदार उद्योगसमूह कार्लाईलने आपला येस बँकेमधील 2 टक्के हिस्सा 1441 कोटींना विकला. एनएसई भांडवल बाजारात बल्क डीलच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आला. एकूण 24.27 रुपये प्रतिसमभाग दरावर 594 दशलक्ष समभागांची विक्री करण्यात आली. या विक्रीपश्चात कार्लाईल समूहाचा येस बँकेमधील हिस्सा 9.11 टक्क्यांवरून 7.13 टक्क्यांपर्यंत खाली आला. यापूर्वी फेब्रुवारीमध्येदेखील कार्लाईल समूहाने येस बँकेमधील 1 टक्का हिस्सा 1057 कोटींना विकला होता.
श्र निदाल समूहाची पायाभूत प्रकल्प उभारणारी कंपनी 'जेएसडब्ल्यू इन्फ—ा'चा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा 809 टक्के वधारून 329.08 कोटीवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा 302.26 कोटी होता. कंपनीचा महसूल 19.8 टक्क्यांनी वधारून 915.30 कोटीवरून 1096.38 कोटी झाला.
देशातील एफएमसीजी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी 'डाबर'चा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील निव्वळ नाफा 16 टक्के ने वधारून 350 कोटी झाला. कंपनीचा महसूल 5.1 टक्के वधारून 275 कोटी झाला. कंपनीचे मार्जिनदेखील 15.3 टक्क्यांवरून 16.58 टक्के झाले.
आरोग्य क्षेत्रातील कंपनी मणिपाल हॉस्पिटल्स मेडिका सिनर्जी कंपनीमधील 87 टक्के हिस्सा 1400 कोटींना घेण्याची शक्यता. मेडिका सिनर्जी कंपनीची कोलकाता, सिलिगुरी, रांची यांसारख्या शहरांमध्ये हॉस्पिटल्स आहेत. या हिस्सा खरेदीपश्चात मणिमाल समूहाची एकूण 14 राज्यांत 37 हॉस्पिटल्स होतील. या समूहाची क्षमता 10,500 खाटांपर्यंत(बेडस्) वाढू शकेल.
देशातील महत्त्वाची आदित्य बिर्ला समूहाची सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंटचा गत आर्थिक वर्षाचा चौथ्या उत्पादक कंपनी अल्ट्राटेक 11 तिमाहीचा निव्वळ नफा 35.5 टक्के वधारून 2258 कोटी झाला कंपनीचा महसूलदेखील 9.4 टक्के वधारून 20,419 कोटी झाला. कंपनीचे इब्रिटा मार्जिनदेखील 17.8 टक्क्यांवरून 20.1 टक्क्यांपर्यंत वाढले.
श्र दिवाळखोर अनिल अंबानी उद्योग समूहाची भूतपूर्व कंपनी 'रिलायन्स कॅपिटल' मला खरेदी करण्यासाठी हिंदुजा समूह उत्सुक आहे. हिंदुजा समूहाची इंडसिंड इंटरनॅशनल होल्डिंग्स (आयआयएचएल) मार्फत बोली लावल्यात आली; परंतु रिलायन्स कॅपिटल या खरेदी करण्यासाठी आधी कंपनीवर असलेले कर्ज भागवणे आवश्यक आहे. या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकांनी व्यवहारपूर्तीआधी 9650 कोटींच्या रकमेची मागणी केली आहे. हिंदुजा समूहाला हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी थकीत रक्कम भरण्यासाठी 27 मेपर्यंत बँकांकडून कालावधी देण्यात आला आहे. रिलायन्स कॅपिटलचे हिंदुजा समूहाकडे पूर्णपणे हस्तांतरण होण्यासाठी अद्याप सेबी, रिझर्व्ह बँक, आयआरडीएआय या नियामक संस्थांची मंजुरी येणे बाकी आहे.
लुब्रिझोल नावाच्या रसायने उत्पादन करणार्या कंपनीने पुण्यात ग्लोबल कॅबिलिटी सेंटर (जीसीसी) सुरू केले. भारतात गुजरातमधील दहेज प्रकल्पाची रसायननिर्मिती क्षमता दुप्पट करण्यासाठी तसेच नवी मुंबईत ग्रीस लॅब प्रकल्प उभारण्यासाठी भारतात 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या काही निवडक प्रकारच्या कर्ज वाटपावर बंदी घातली होती. 15 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या इन्स्टा इएमआय कार्ड आणि ऑनलाईन 'ई-कॉम' प्रकारच्या कर्जवाट्याला स्थगिती दिली. ऑनलाईन कर्जवाटपासंबंधीचे रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याने यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मागील सहा महिन्यात या कंपनीचा समभाग निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक वाढूनदखोल 7 टक्के खाली आला होता.
अॅपल या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने तब्बल 160 अब्ज डॉलर्सच्या समभाग पुनर्खरेदीची (शेअर्स बायबॅक) घोषणा केली. घोषणा होताच समभागामध्ये तब्बल 6 टक्क्यांची वाढ झाली.
26 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.412 अब्ज डॉलर्सनी घटून 637.922 अब्ज डॉलर्स झाली. गंगाजळीत मागील सलग 3 सप्ताहांत घट झाली आहे. 5 एप्रिल रोजी गंगाजळी आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर 648.562 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)
हेही वाचा :