Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, realty ला फटका, IT तेजीत

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, realty ला फटका, IT तेजीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमकुवत जागतिक संकेत आणि यूएस ट्रेझरी बाँडमध्ये वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली. भारतीय इक्विटी निर्देशांक आज सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स आज २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७३,८७६ वर बंद झाला. तर निफ्टी १८ अंकांनी घसरून २२,४३४ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

विशेष म्हणजे आज कमकुवत सुरुवातीनंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली आणि दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. बाजारात सरकारी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे सपोर्ट मिळाला. तर एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव राहिला.

आज बाजाराची सुरुवात कमकुवत झाली होती. पण सुरुवातीच्या तासांत रिकव्हरी झाली. IT, मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर निर्देशांकांतील तेजीमुळे तो विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला. पण बाजार बंदच्या वेळी विक्री झाल्याने सुरुवातीचा नफा कमी झाला.

क्षेत्रीय आघाडीवर, रियल्टी निर्देशांक २.५ टक्क्यांनी घसरला. तर ऑटो निर्देशांक ०.४ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान, पॉवर, पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी आणि आयटी, मीडिया निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्याने वधारला.

'हे' शेअर्स टाॅप गेनर्स, टाॅप लूजर्स

सेन्सेक्स आज ७३,७५७ वर खुला झाला. त्यानंतर तो ७४,१५१ पर्यंत उच्चांकाजवळ पोहोचला. पण तो बंद होताना ७३,९०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह हे टॉप लूजर्स होते. तर एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले.

निफ्टीवर श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा हे तेजीत होते. तर नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे शेअर्स घसरले.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीला विलंब होईल या धास्तीने इतर आशियाई बाजारांतही घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news