Stock Market Closing Bell | शेअर बाजारात अस्थिरता; Raymond ला मोठा फटका, काय कारण?

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात अस्थिरता; Raymond ला मोठा फटका, काय कारण?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीमुळे आज बुधवारी (दि. २२) भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ-उतार राहिला. सेन्सेक्स आज ९२ अंकांनी वाढून ६६,०२३ वर बंद झाला. तर निफ्टी २८ अंकांच्या किरकोळ वाढीसह १९,८११ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

बँक, मेटल आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरल्याने क्षेत्रीय पातळीवर संमिश्र कल दिसून आला, तर आयटी, पॉवर, हेल्थ केअर आणि एफएमसीजी ०.३-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी खाली आला.

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय पातळीवर पॉवर आणि फार्मा वगळता इतर सर्व निर्देशांकांनी लाल चिन्हात व्यवहार केला. ऑटो, मेटल, बँक आणि रियल्टी क्षेत्र दबावाखाली राहिले. तर फार्मा, ऑईल आणि गॅस तसेच पॉवरमध्ये खरेदी दिसून आली. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स आज वाढले. तर इंडसइंड बँक, कोटक बँक, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टी ५० वर बीपीसीएल, एनटीपीसी, सिप्ला, इन्फोसिस, पॉवर ग्रिड हे टॉप गेनर्स राहिले. तर इंडसइंड बँक, हिंदाल्को, कोटक बँक, एम अँड एम, अदानी पोर्ट्स हे घसरले.

गौतम सिंघानिया – नवाज मोदी घटस्फोटाचा Raymond ला मोठा फटका

रेमंड लिमिटेडच्या शेअर्सवर (Raymond Share Price) आजही विक्रीचा दबाव अधिक दिसून आला. रेमंडचे शेअर्स आज सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. गेल्या सात दिवसांपासून या शेअर्समध्ये घसरण कायम सुरु आहे. रेमंडचे अध्यक्ष गौतम हरी सिंघानिया यांच्या विभक्त पत्नी नवाज मोदी यांनी त्यांच्या संपत्तीच्या ७५ टक्के मागणी केली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रेमंडच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. बाजार बंद होण्याआधी हा शेअर ३.७३ टक्के घसरून १,६७७ वर होता. (Gautam Singhania-Nawaz Modi) सिंघानिया दाम्पत्याच्या विभक्त झाल्याची बातमी दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच १३ नोव्हेंबरला समोर आली होती. ३२ वर्षांनंतर वेगळे होत असल्याची माहिती स्वतः गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर दिली होती.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सूट फॅब्रिकच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या रेमंड लिमिटेडचे ​​अब्जाधीश अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी यांच्यातील घटस्फोटाच्या वृत्तांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे रेमंडच्या शेअर्समध्ये सातव्या दिवशी घसरण झाली. सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर १३ नोव्हेंबरपासून रेमंडचा शेअर १२ टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलाचे १८० दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, जपानचा निक्केई निर्देशाक (Japan's Nikkei) बुधवारी वाढला. निक्केईने सुरुवातीच्या घसरणीतून सावरत पुन्हा उसळी घेतली. हा निर्देशांक ०.२९ टक्क्यांनी वाढून ३३,४५१.८३ वर बंद झाला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news