शेअर बाजारात तेजीची संथ आणि सावध गती, ‘हे’ शेअर्स ॲक्शनमध्ये?

शेअर बाजारात तेजीची संथ आणि सावध गती, ‘हे’ शेअर्स ॲक्शनमध्ये?
Published on
Updated on

एखाद्या योद्ध्याने अतिशय सावध राहून दबकत दबकत आगेकूच करावी, तसे भारतीय शेअर बाजाराचे सध्या सुरू आहे. तोंडावर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आहेत. आठ महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. निफ्टीचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे; पण समोर हे दोन महत्त्वाचे प्रसंग आहेत. खेळाडू पूर्ण जोशात असावा; परंतु मैदानावर अडथळे असावेत, तसे झाले आहे.

गत सप्ताहात निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे पावणे दोन आणि दीड टक्क्याने वाढून 19731.80 आणि 65794.73 वर बंद झाले. निफ्टी बँक निगेटिव्ह झोनमध्ये जवळजवळ सपार बंद झाले. निफ्टी बँकचे हे अडखळणे गेले वर्षभर सुरू आहे. गेल्या वर्षात जिथे निफ्टी 50 पावणे आठ टक्क्यांनी वाढला तिथे निफ्टी बँक केवळ पावणे तीन टक्क्यांनी वाढला. चार मोठ्या व प्रमुख बँकांचा गेल्या वर्षातील नकारात्मक परतावा याला कारणीभूत आहे. त्या बँका खालीलप्रमाणे-

HDFC Bank – वर्षभरातील परतावा – उणे 6.75 %
Kotak Bank- वर्षभरातील परतावा –
उणे 10.15 %
SBI- वर्षभरातील परतावा – उणे 6.60%
ICICI Bank – वर्षभरातील परतावा –
अधिक 0.05%

वास्तविक पाहता या चारही बँकांनी प्रत्येक तिमाहीला उत्कृष्ट आर्थिक निकाल सादर केले आहेत. परंतु, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा त्यांच्याकडून काय आहेत, ते समजत नाही.

बाजार तेजीच्या मूडमध्ये आहे, हे दोन प्रकारच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. पहिली म्हणजे, तेजीचे वातावरण असेल, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स वाढतात. गतसप्ताहात निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 4.35 टक्के, तर मिड कॅप इंडेक्स 3.14 टक्के वाढला. दुसरी आकडेवारी FII आणि DII यांची खरेदी मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे ऊखख अखंड खरेदी करत आहेत. गत सप्ताहातही त्यांनी 2241.10 कोटी रुपयांची खरेदी केली, तर ऋखख आस्ते कदम खरेदीच्या दिशेने वळत आहेत. त्यांची आठवड्यातील खरेदी होती 72.90 कोटी रुपये!

Exchanges, Financial Services Companies यांच्या शेअर्समधील तेजी हेसुद्धा बाजारातील एकूण तेजीचे एक लक्षण असते. आठवड्यातील खालील शेअर्समधील तेजी पाहा!

1) BSE सध्याचा भाव 2411.30 रुपये. सप्ताहातील वाढ 22.81 टक्के.
2) CAMS सध्याचा भाव 2832.95 रुपये. सप्ताहातील वाढ 19.22 टक्के.
3) Motilal Oswal Financial Services सध्याचा भाव रु. 1217. सप्ताहातील वाढ 17.93 टक्के
4) MCX सध्याचा भाव 2871.35 रुपये. सप्ताहातील वाढ 16 टक्के.

नॅटको फार्माने आपले दुसर्‍या तिमाहीचे निकाल सादर केले. नेट प्रॉफीटमध्ये 550 टक्के वाढ आणि सेल्समध्ये 135 टक्के वाढ! यांना म्हणतात दमदार निकाल!

RVNL च्या Bankfacilities ना Care Edge ने AAA रेटिंग दिले. शिवाय सेंट्रल रेल्वेकडून कंपनीला मध्य प्रदेशमध्ये पूल आणि बोगदे बांधायचे 311 रुपये कोटींचे कंत्राट मिळाले.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित टाटा टेक्नालॉजीजचा IPO आता येत आहे. 475 ते 500 रुपये हा त्याचा Priceband असेल आणि 30 शेअर्सचा एक लॉट असेल. Tata Investment ही कंपनी या IPO ची एक लाभार्थी असेल. आठवड्यात तिचा शेअर वीस टक्क्यांनी वाढून All Time High च्या पातळीवर पोहोचला आहे. सध्याचा भाव 3909.90 रुपये.

या सप्ताहातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे मॉर्गन स्टॅन्लेने तिच्या Emerging markets साठीच्या MSCI Global Standard Index ची पुनर्रचना जाहीर केली. नवीन नऊ कंपन्यांचा या इंडेक्समध्ये समावेश झाला आहे. पूर्वीच्या कोणत्याही कंपनीला वगळण्यात आलेले नाही.

या इंडेक्समध्ये समावेश असणार्‍या भारतीय कंपन्यांची संख्या आता 131 झाली आहे. आणि त्यांचे एकूण इंडेक्समधील एकत्रित थशळसहींरसश झाले आहे 16.3 टक्के. हे आतापर्यंतचे सर्वाधिक Weightage आहे आणि मागील तीन वर्षांत ते दुप्पट झाले आहे. रिटेल गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंंतवणुकीसाठी फंडामेंटली स्ट्राँग शेअर्स हवे असतात. त्यांनी मॉर्गन स्टॅन्लेच्या या यादीचा अवश्य अभ्यास करावा. ज्या नऊ शेअर्सचा समावेश नव्याने करण्यात आला आहे, ते शेअर्स पुढीलप्रमाणे

1) Suzlon
2) IndusInd Bank
3) One 97 Communications
4)APL Apollo Tubes
5) macrotech Developers
6) Persistent Systems
7) Polycab India
8) Tata Communications
9) Tata motors

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news