पुढारी डेस्क : ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी संपन्न होणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी गणपती विसर्जन २०२२ निमित्त मध्य रेल्वे दि. १० सप्टेंबर रोजी (९/१०.९.२०२२ मध्य रात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या (Special Trains) चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.०० वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल, ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल तर कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.२० वाजता पोहोचेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.
पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल, पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल. अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?