पुणे: हिंदूराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला ! | पुढारी

पुणे: हिंदूराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला !

पुणे, पुढारी वृतसेवा: रुग्णाला पाहण्याच्या बहाण्याने ससून रुग्णालयात आलेल्या तरुणांनी हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने हल्ला करीत जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तेथे ड्युटीवर असलेले अमोल बगाड या पोलिस कर्मचार्‍याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह पथकाने ससूनमध्ये धाव घेतली. फरार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे आहेत. सध्या तो मोकामध्ये येरवडा कारागृहात बंद आहे. तेथेही त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सध्या तो आजारी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.

Back to top button