उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात दाखल करण्यात आला होता. याला ईडीने विरोध केल्यानंतरही सीबीआय विशेष न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा रिपोर्ट स्वीकारत, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा दिला.

श्रीधर पाटणकर हे व्यवसायाने बिल्डर आहेत. प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यात त्यांचे प्रकल्प आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून ८४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या रडारावर होते. या घोटाळ्याप्रकरणी कोणाताही सबळ पुरावा नसल्याचा अहवाल कोर्टात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने  सादर केला होता. याला ईडीचा विरोध असतानाही सीबीआय विशेष न्यायालयाने दाखल केलेला रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. या अहवालानुसार श्रीधर पाटणकर यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.

कथित ८४ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी पाटणकरांबरोबर काही बँक अधिकारी, ज्वेलर्स, पुष्पक बुलियन कंपनीचे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून पाटणकर आणि संबंधितांचा तपास सुरू होता. याप्रकरणी ईडीने करवाई करत, श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांसह सहा कोटींहून अधिकची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news