भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचीय, पण मुंबईत सेनेचाच झेंडा असेल : संजय राऊत | पुढारी

भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचीय, पण मुंबईत सेनेचाच झेंडा असेल : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. पण मुंबईत सेनेचाच झेंडा असेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. कालच्या ईडी तपास यंत्रणेला मी सामोरे गेलो, मी कधीच घाबरणार नाही, असे राऊत यांनी ईडीच्या चौकशीनंतर स्पष्ट केले. यावेळी ते शिंदे-भाजपच्या स्ट्रॅटेजीबद्दलही बोलले.

मलाही गुवाहाटीचा पर्याय होता. पण, बाळसाहेबींची शिकवण मी विसरणार नाही. प्राण जाए पण वचन न जाए. एकनाथ शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत, हे ठाकरेंकडून स्पष्ट झालं आहे. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळी खेळली गेलीय. पण, मुंबईवर शिवसेनेचाच झेंडा दिसेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

भाजप आणि शिंदे यांची स्ट्रॅटेजी स्पष्ट कळतेय. मी काहीही अयोग्य केलेलं नाही. नव्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी काम करावं. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा माणूस आहे. मी फुटणारा बुडबुडा नाही. ठाकरे आणि शिवसेना ही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. जिथ ठाकरे, तिथे शिवसेना आहे. मी राज्यसभेत हरलो असतो तरी शिवसेना सोडली नसती, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button