Ram Charan : ‘आरआरआर’चा राम चरण बनणार पुढील जेम्स बॉन्ड?

actor ram charan
actor ram charan

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम चरण चित्रपट 'RRR' (Ram Charan) मध्ये आपल्या भूमिकेमुळे हॉलिवूड दिग्दर्शकांची मने जिंकली आहेत. मार्वल क्रिएटरने राम चरण हा पुढील जेम्स बॉन्ड होऊ शकतो अशी इच्छा जाहीर केलीय. क्रिएटर राम चरणच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले आहेत.  (Ram Charan)

'RRR' चा राम चरण होऊ शकतो पुढील जेम्स बॉन्ड?

जागतिक बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करणाऱ्या 'RRR' चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दाक्षिणात्य स्टार अभिनेता राम चरण दिसला होता. त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील होताना दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येताच बाजी मारली. देशभरातील समीक्षकांकडून त्याला केवळ प्रशंसाच मिळाली नाही, तर हॉलिवूडमधूनही त्याची प्रशंसा झाली. आता असे वृत्त समोर आले की, अभिनेता राम चरण त्यांच्या चित्रपटांमध्ये पुढील जेम्स बाँड असू शकतो, असे मार्वलच्या निर्मात्यांनी सहमती दर्शवलीय.

अलीकडेच, मार्वल निर्मात्याने राम चरणला पुढील जेम्स बाँड म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केलीय. राम त्याच्या अभिनयाने खूप प्रभावित दिसत आहेत. डॅनियल क्रेगची ही व्यक्तिरेखा कोणाला द्यायची यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या यादीत इद्रिस एल्बा आणि रेगे जीन-पेजसारख्या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

अमेरिकन माजी संगीत पत्रकार आणि टेलिव्हिजन लेखक आणि निर्माता चेओ होदारी कोकर (निर्माता, लेखक, कार्यकारी निर्माता, ल्यूक केजचे शोरनर) यांच्या मते ब्रिटीश गुप्तचर चित्रपटासाठी राम चरण योग्य आहे.

Cheo ने ट्विटरवर एक यादी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी त्याच्या निवडीचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये इद्रिस एल्बा, सोपे दिरिसू, मॅथ्यू गुड आणि डॅमसन इद्रिस सारख्या अभिनेत्यांची नावे आहेत. या ट्विटनंतर लगेचच त्याने आणखी एक ट्विट केले आणि या स्टार्सना जेम्स बाँडच्या भूमिकेत का पाहायचे आहे, हे स्पष्ट केले. या पोस्टमध्ये त्यांनी 'RRR' अभिनेता राम चरण या चित्रपटाच्या शक्यतेबद्दल आणि या नियमाला पात्र असण्याचे सांगितले आहे.

एस एस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली आहे. दिग्दर्शक जेम्स गन, स्कॉट डेरिकसन आणि रुसो ब्रदर्स यांनीही चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण देखील दिसले आहेत. हा चित्रपट यावर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news