हिंगोली : गोजेगाव येथे मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला; शेतकऱ्याचे नुकसान | पुढारी

हिंगोली : गोजेगाव येथे मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला; शेतकऱ्याचे नुकसान

औंढा; पुढारी वृत्तसेवा : औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील धामनदरा भागातील मुसळधार पावसामुळे (कृषी खात्याअंतर्गत केलेला ) पाझर तलाव फुटला. या घटनेत अंदाजे दहा ते पंधरा हेक्टर जमिनीवरील पेरलेली पीके सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस इतर अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील ओढा हा सरळ शेतातून गेल्यामुळे शेतात पाणी साचले आहे. तसेच शेतकरी दत्तराव रवंदळे यांच्या शेतातील स्प्रिंकलर सिंचनाच्या ३० शेडी वाहून गेल्या आहेत. यातील १३ शेडी सापडल्या. तर बाकी १७ शेडी वाहून गेल्या असून १७००० रुपयाचे नुकसान झाले आहे.

ओढ्याचे पाणी शेतात जाऊन किसन सांगळे, बबनराव सांगळे, पद्माबाई भिमराव खिलारे, बंडू भिकाजी सांगळे, नथू सांगळे, निळकंठ सांगळे, पार्वती बाबाराव सांगळे, गोविंदराव खिलारे, विनायक सांगळे, सदाशिव सांगळे, दारकाबाई उत्तम सांगळे, बालाजी खिलारे, गणपत साहेबराव सांगळे, अनंता साहेबराव सांगळे, दादाराव रुस्तुम सांगळे, दत्तराव रवंदळे, गंगाराम नागरे, घनश्यामपुरी, परागबाई रुस्तुम यादव, बाबाराव सांगळे, दादाराव रुस्तुम सांगळे, सखुबाई साहेबराव सांगळे, इत्यादी शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झाले आहे. यानंतरप नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन योग्य ती मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button