पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (Father's Day ) सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षीचा फादर्स डे आज साजरा करण्यात येत आहे. लहानपासून ते मोठ्यापर्यत्न सर्वाच्या जीनवात जसे आईचे महत्व स्थान असते तितकेच वडिलांचेही असते. यानिमित्ताने जाणून घेवूयात बॉलिवूडमधील असे काही स्टार्स, की ज्यांनी आपल्या मुलांच्यासोबत बॉलिवूड क्षेत्रात चारचॉद लावले आहेत. ज्या बाप- लेकाची जोडी चित्रपट क्षेत्रात हिट झाली त्यच्याविषयी…
बॉलिवूडमधील बाप-लेकीच्या जोडीबद्दल बोलताना अनेक स्टार्सचा उल्लेख केला जातो. ज्या स्टार्सनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनचा ठसा उमठवत नाव कमावले आहे. त्यातील काही ठराविक जोडी पुढील प्रमाणे. (Father's Day )
बॉलिवूड अभिनेता जॉकी श्रॉफने १९८०- ९० दशकामधील सुपरहिट अभिनेत्यांच्या यादीमध्ये नाव टॉपला होते. जवळपास चार दशके सिनेसृष्टीमध्ये काम करत त्यांनी चाहत्याचे मनोरंजर केलं आहे. त्यांनी कार्यकिर्दीत 'सौदागर', 'राम लखन', 'रंगीला', 'बॉर्डर', 'रुप की राणी चोरों का राजा' असे अनेक चित्रपट सुपरहिट चित्रपटातून अभिनयाची मोहर उमठवली. तर जॉकीचा मुलगा टायगर श्रॉफ देखील आज बॉलिवूडच्या उबरठ्यावर पाय रोवून उभा आहे.
टायगरला त्याच्या अॅक्शन सीन आणि अभिनयासाठी प्रसिद्ध झोतात आहे. त्याने हीरोपंती" (2014) चित्रपटातून पहिल्यादा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्याने मागे वळून न पाहता एकापाठोपाठ 'धूम ३', 'फौजी', 'बागी २', 'स्टूडेंट ऑफ द ईयर २' या धमाकेदार चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये मोहर लावली.
धर्मेन्द्र हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास ३०० हून अधिक चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमठवला आहे. त्याच्या तडफदार भूमिकेमुळे त्यांना 'ॲक्शन हिरो' म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. धर्मेन्द्र यांचा शोले चित्रपटातील डॉयलॉग 'कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा' आजही चाहत्याच्या मनात घर करून आहे. यानंतर त्यांनी 'चुपके चुपके', 'दिल भी तेरा हम भी तेरे', 'अनपड' (1962), 'बंदिनी' (1963 ) आणि 'सूरत आणि सीरत' (1963) , 'फूल और पत्थर', 'अनुपमा', 'मांझली दीदी', 'सत्यकाम' यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं.
धर्मेन्द्रचा मुलगा सनी देओलही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये प्रकाश झोतात आला आहे. नुकताच सनीच्या आश्रम बेवसिरिजमधील बाबा निरालीच्या भूमिकेने चाहत्याचा भारावून सोडले आहे. यात त्याने खलनायकाची जबरदस्त भूमिका निभावली आहे.
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. परंतु, त्याच्या चित्रपटातील अभिनयाची मोहर आजही चाहते विसरलेले नाहीत. ऋषी कपूर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. १९७० मधील 'मेरा नाम जोकर' या त्यांच्या पहिल्या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी बॉलिवू़डमध्ये एकाहून एक हिट चित्रपट केले.
यात त्यांनी 'मेरा नाम जोकर', 'यादों की बारात', 'बॉबी', 'कभी कभी', 'लैला मजनू', 'फूल खिले हैं गुलशन गुलशन', 'कर्ज', 'प्रेम रोग', 'कुली', 'धन दौलत', 'अमर अकबर एन्थोनी', 'नगीना', 'हवालात', 'राही बदल गये', 'चाँदनी', 'दीवाना', 'साहिबाँ', 'याराना', 'फना', 'नमस्ते लंदन', 'ओम शाँती ओम', 'दिल्ली ६', 'चिंटू जी', 'सदियाँ', 'हाउसफुल २', 'ऑल इस वेल', 'मुल्क' यासारख्या एकाहून एक हिट चित्रपटात अभियन साकारून ठसा उमठवला. ऋषी कपूर यांच्या पाठोपाठ त्याचा मुलगा रणबीर कपूरदेखील बॉलिवूड आपले कमावले आहे. रणबीरचे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीरच्या हटके स्टाईल आणि अभिनयाच्या सर्वजण प्रेमात पडले आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावरही एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिताभ यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने बॉलिवूडमधिये एकापैक्षा एक हिट चित्रपट देवून चाहत्याच्यात क्रेझ निर्माण केली आहे.
यांनी धूम 3, बोल बच्चन, खेळाडू, दम मारो दम, गेम, खेले हम जी जान से, रावण, पा, दिल्ली 6, दोस्ताना, द्रोण, मिशन इस्तंबूल, सरकार राज, लगा चुनरी में डाग, आग, झूम बराबर झूम, गुरू, धूम 2, उमराव जान, ब्लफमास्टर, दास, तेरा जादू चल गया, बंटी और बबली, चालवा, एलओसी: कारगिल, धाई अक्षर प्रेम के, जमीन, मुंबई से आया मेरा दोस्त, ओम जय जगदीश, मैने प्यार किया. या चित्रपटांतून अभिनयाची मोहर उमठवली. अनेक हिट चित्रपटातून आपल्या वडिलांप्रमाणे स्वत:चे नाव कमावले आहे.
सुनील दत्त यांनी बॉलिवूडमध्ये १९५५ मध्ये रेल्वे प्लेटफाॉर्म या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केले. यानंतर त्यांचे एकापैक्षा एक हिट चित्रपटात येत गेले. याच 'साधना', 'सुजाता', 'मुझे जीने दो', 'गुमराह', 'वक्त', 'खानदान पडोसन', 'हमराज', 'मुझे जीने दो', 'रॉकी', 'डाकू ओर जवान', 'यादे', 'दर्द का रिश्ता', 'आग कब बुझेगी' यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तर सुनाल दत्त याच्या पाठोपाठ त्याचा मुलगा संजय दत्तने बॉलिवूडमध्ये अभिनयाची मोहर उमटवली आहे. संजयने बालपणात १९७२ मध्ये आपल्या वडिलांसोबत '[रेशमा और शेरा' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहर उमटविला.
यानंतर त्याने अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका प्रभावीपणे साकारताना दिसला. यानंतर त्याने जीना मरना तेरे संग, साजन, कुरबानी, खून का कर्ज, क्रोध, जीने दो, खतरनाक, तेजा, ठाणेदार, जहरीले, दो कैदी, मोहब्बत का पैगाम, हम भी इन्सान है, भोला, कानून अपना अपना, हत्यार, अविनाश, कब्जा यासारख्या चित्रपटातून अभिनयाची ठसा उमठवला. (Father's Day )
हेही वाचलंत का?