Sleep & Clock :रात्रीची शांत झोप महत्त्वाची; जाणून घ्या झोपेच्या ‘जैविक’ घड्याळाविषयी

Sleep & Clock :रात्रीची शांत झोप महत्त्वाची; जाणून घ्या झोपेच्या ‘जैविक’ घड्याळाविषयी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी शरीरात एक जैविक घड्याळ म्हणजेच 'बायोलॉजिकल क्लॉक' सक्रिय असते, ज्याला अवयवांचे घड्याळ असेही म्हणतात. या जैविक घड्याळाप्रमाणे मानवी शरीर दिवसभर कार्यरत राहते. हे जैविक घड्याळ  (Sleep & Clock)  मानवी शरीराला नियंत्रित करत असते. यामध्ये बदल केला तर त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे घड्याळ विस्कळीत झाल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे जैविक घड्याळाविषयी जाणून घेणे अन् त्याप्रमाणे दैनंदिन जीवन जगणे हे गरजेचे आहे.

झोप आणि जागरण (Sleep & Clock)  यावरही मानवाचे आरोग्य अवलंबून असते. चांगली झोप ही निरोगी आरोग्याचे प्रतीक मानले जाते. झोप व्यवस्थित न झाल्यास, टप्‍प्‍याटप्‍प्‍याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत जाते. यावरून मानवी झोप, जाग याच्यामागेही जैविक' घड्याळ कार्यरत असल्याचे दिसते. आपल्या दिवसभरातील कार्यपद्धतीच्या लयबद्धतेवर आपली झोप अवलंबून असते. शरीराचे तापमान, चयापचय, ग्रंथीरस, पेशी आणि पर्यावरणीय संकेत (प्रकाश, तपमान) यामधील लयबद्धता आपली झोप नियंत्रित करते. तुमच्या दिनचर्येत बदल झाल्यास तुमच्या शरीराचे 'जैविक' घड्याळ बिघडते आणि त्याचा परिणाम हा झोपेवर होतो, असे आजवरच्‍या अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

Sleep & Clock: शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचे जैविक घड्याळ बिघडलेले

आपल्या डोळ्यांच्या रेटिनामधील वैशिष्ट्यीकृत पेशी प्रकाशावर प्रक्रिया करून मेंदूला दिवस की रात्र हे सांगतात. प्रकाश आणि काळोख आपल्या झोपेचे चक्र उन्नत किंवा खराब करू शकतात. त्यामुळे अनेक शिफ्टमधील मुख्यत: नाईट शिफ्टमध्ये काम करण्याऱ्या लोकांमधील जैविक घड्याळ (Sleep & Clock)  हे बिघडलेले दिसते.

काय आहे जैविक घड्याळाची संकल्पना?

जैविक घड्याळ हे प्रत्येक सजीवाचे शरीर आणि पृथ्वीची गती, सूर्योदय-सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन्स पातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करणारी यंत्रणा असते. जैविक घड्याळ हे मानवी शरीरातल्या हालचालींना नियंत्रित करते. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल झाला तर शरीरावर मोठा परिणाम होतो. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्रींसाठी अनुकूल झाले. त्यामुळे मानवी जीवनात जैविक घड्याळ महत्त्‍वाचे आहे.

जैविक घड्याळानुसार पृथ्वी कार्य करते

२०१७ मध्ये अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेत्या तीन शास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील जैविक घड्याळाचे गुपित उघड केले. जेफ्री हॉल, मायकेल रॉसबॅश आणि मायकेल यंग यांना यांना या औषधशास्त्रातील संशोधाबद्दल नोबेल जाहीर झाले  होते. मानवी शरीर, झाडं, प्राणी, कीटक, बुरशीजन्य पेशी हे सगळं जैविक घड्याळानुसार कार्यरत असतात.असे मुलभूत संशोधनाचा शोध त्‍यांनी घेतला. जैविक घड्याळाप्रमाणे आपण आपली दिनचर्या निश्चित केली,  आपण निरोगी जीवनाचा दीर्घकाळ आनंद घेऊ शकतो. असेही या संशोधनातून मांडण्यात आले होते. आता आपली दिनचर्या जैविक घड्याळानुसार राहिली तर निश्‍चितच त्‍याचा आपल्‍या मानसिक आणि शारीरिक लाभ मिळतो, हे वेगळे सांगण्‍याची गरज नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news