Sleep better : झोपे येत नाही? आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर | पुढारी

Sleep better : झोपे येत नाही? आहारात 'या' पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झोप हा निरोगी आरोग्‍याचा पाया आहे, हे आपण अनेकवेळा ऐकलेले वाक्‍य. मात्र आधुनिक जीवनशैलीत निद्रानाश ही आरोग्‍याच्‍या मुख्‍य समस्‍यांपैकी एक झाली आहे. रात्री सात ते ९ तासांची झोपेमुळे रोगप्रतिकारशक्‍ती मजबूत होते.  त्‍याचबरोबर विविध आजारांवर मात करण्‍यासही उपयुक्‍त ठरते. रात्री झोप न येणे याचा दुष्‍परिणाम आपल्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर होत असतो.तणाव आणि चिंता याबरोबर अयोग्‍य आहारामुळेही झोपेवर परिणाम होतो. ( Sleep better ) यावर वैद्यकीयशास्त्रात सखोल संशोधन झाले आहे. मात्र आहारात आपण काही पदार्थांचा समावेश करत अनिद्रेवर मात करु शकतो. जाणून घेऊया या पदार्थांविषयी…

आहारातज्‍ज्ञांच्‍या मते सायंकाळी तुम्‍ही कोणता आहार घेता याचा झोपेवर परिणाम होतो. काही लोक सायंकाळी जंक फूड खातात. याचा त्‍यांच्‍या झोपेवर परिणाम होतो. तसेच सायंकाळी आणि रात्री चहा आणि कॉफी या पेयही टाळणे आवश्‍य ठरते. मात्र काही पदार्थांचा आहारात समावेश केल्‍यास तुम्‍हाला गाढ झोप येण्‍यास मदत होते.

Sleep better : कोमट दूध

झोपण्‍यापूर्वी कोमट दूध घेणे फायदेशीर ठरते. दूधात अमीनो ऍसिड असते यामुळे झोप येण्‍यास मदत होते. तसेच दूधात असलेल्‍या ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

ड्राय फ्रुट्स

पचन सुधारण्यासाठी आणि झोपायला मदत करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर ड्राय फ्रूट्स खाण्याची शिफारसही आहारतज्‍ज्ञ करतात. तुम्‍हाला अनिद्रेचा त्रास असले तर सायंकाळी जंक फूड खाणे टाळा. त्‍याऐवजी सायंकाळच्‍या स्‍नॅक्‍समध्‍ये काजू, बदाम आणि अक्रोडचा समावेश करा. त्‍यामुळे तुम्‍हाला चांगली झोप येण्‍यास मदत होईल.

कॅमोमाइल चहा

ज्यांना अनिद्रेचा त्रास होतो त्यांच्यासाठी कॅमोमाइल चहा घेण्‍याचा सल्‍ला दिला जातो. आता कॅमोलाइन चहा म्‍हणजे काय, असा प्रश्‍नही तुमच्‍या मनात येईल. कॅमोलाइल चहा हा कॅमोलाइल फुलांपासून बनवलेला हर्बल टी आहे. कॅमोमाइल फुलामधील औषधी गुणधर्मांमुळे शांत झोप लागण्‍यास मदत होते. याच्या सेवनाने तुमच्या मनावरील ताण कमी होण्‍यास मदत होते. आणि तुम्हाला शांत झोप लागते.

आले-तुळशीचे पाणी

आले आणि तुळशीला पाण्यात उकळून हे सुखदायक मिश्रण बनवता येते. झोपण्‍यापूर्वीही तुम्‍ही हे मिश्रण घेतल्‍यास पचन व्‍यवस्‍थाही चांगली राहते. तसेच गाढ झोप येण्‍यासही मदत होते.

हेही वाचा : 

 

Back to top button