Shraddha Walker Murder Case : आफताबची श्रद्धासोबतच्या भांडणाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती, व्हॉईस सॅम्पलिंग चाचणीतून होणार पुष्टी

Shraddha Walker Murder Case : आफताबची श्रद्धासोबतच्या भांडणाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती, व्हॉईस सॅम्पलिंग चाचणीतून होणार पुष्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठा 'ऑडिओ पुरावा' हाती लागला आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा यांचा हा ऑडिओ आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. दरम्यान, आफताब पूनावाला याला व्हॉईस सॅम्पलिंग चाचणीसाठी सीबीआय मुख्यालयात आणण्यात आले आहे.

श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोपाखाली आफताब पूनावाला अटकेत आहे. त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे सुमारे तीन आठवडे ठेवले होते. नंतर ते शहरातील विविध ठिकाणी फेकून दिले. त्याला 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांना ऑडिओ क्लिप मिळाली आहे. ऑडिओमध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. दोघांमध्ये वादावादी होते. आफताब श्रद्धाचा छळ करत होता, हे या ऑडिओवरून सिद्ध होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलीस या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळतो आहे का हे पाहण्यासाठी पोलिस त्याच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आवाजाच्या नमुन्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्याच्या आवाजाचा नमुना सीबीआयच्या सीएफएसएल लॅबमध्ये घेतला जाणार आहे. दरम्यान आफताबला घेऊन आज सोमवारी पोलिस सीबीआय मुख्यालयात पोहोचले.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news