पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२७) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी शिवमोग्गा येथील कमळाच्या प्रतिकृतीत असलेल्या विमानतळाचे तसेच कर्नाटकातील विकास प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या नवीन विमानतळाला अंदाजे ४५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. विमानतळावरील पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग ही कमळाच्या आकारात आहे. या विमानतळावर प्रति तास 300 प्रवासी बसू शकतात, इतकी याची क्षमता आहे. कर्नाटकातील हे पहिलेच मोठे विमानतळ आहे.
कर्नाटक दौऱ्यादरम्यान शिकारीपुरा-राणेबेन्नूर येथील नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेनगुरु रेल्वे कोचिंग डेपो या दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात झाले. शिवमोग्गा-शिकारीपुरा-राणेबेन्नूर या नवीन रेल्वे मार्गामुळे मलनाड प्रदेशाला बेंगळुरू-मुंबई या मुख्य मार्गाला जोडले जाणार आहे.