पुढारी ऑनलाइन डेस्क : Man ki baat : UPI पेमेंट सिस्टिम, ई संजीवनी अॅप, लोकसहभाग आदी गोष्टींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासीयांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधतात. आज या कार्यक्रमाचा 98 वा भाग ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनात देशाच्या डिजिटल प्रगतीवर प्रामुख्याने फोकस होता.
Man ki baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून संवाद साधताना देशाच्या डिजिटल प्रगतीवर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले, जगातील अनेक देश भारताच्या UPI युनिफाइड पेमेंट सिस्टिमकडे आकर्षित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच UPI-PayNow लिंक भारत आणि सिंगापूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. आता या सेवेद्वारे सिंगापूर आणि भारतातील लोक त्यांच्या मोबाईलवरून डायरेक्ट पैशांची देवाण-घेवाण करू शकतात.
कोविड महामारीच्या काळात ई -संजीवनी अॅप लोकांसाठी कशा पद्धतीने एक मोठे वरदान ठरले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ई-संजीवनी अॅप डिजिल इंडियाच्या शक्तीचे एक ज्वलंत उदाहरण आहे. या अॅपद्वारे, टेलि-कन्सल्टेशन, म्हणजेच दूर बसून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलि-कन्सल्टंटची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील हे अप्रतिम ऋणानुबंध ही एक मोठी उपलब्धी आहे. या कामगिरीसाठी मी या सुविधेचा लाभ घेतलेल्या सर्व डॉक्टर्स आणि रुग्णांचे अभिनंदन करतो. भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला आपला एक भाग कसा बनवला आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे," असे ते म्हणाले.
दरम्यान, मन की बातमध्ये सिक्किमचे डॉक्टर मदन मणी आणि उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील मदन मोहन यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी ई-संजीवनी अॅपद्वारे टेलिकन्सलटेशनचा लाभ मिळवलेल्या रुग्णाच्या रुपात स्वतःचा अनुभव सामाईक केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात भारतीय खेळण्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही जेव्हा भारतीय खेळण्यांबाबत सांगितले तेव्हा माझ्या सहकारी नागरिकांनीही याचा सहज प्रचार केला. त्यानंतर आता भारतीय खेळण्यांची क्रेझ खूप वाढली आहे इतकेच नव्हे तर परदेशातही भारतीय खेळण्यांची क्रेझ वाढली आहे. याशिवाय देशातील पारंपारिक कथा-कथन हा प्रकार जेव्हापासून मन की बातमधून प्रदर्शीत व्हायला लागला तेव्हापासून त्याचीही कीर्ती दूरवर पोहोचली आहे. लोक भारतीय कथा-कथन प्रकाराकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले आहे, याचाही उल्लेख त्यांनी मन की बातमधून केला आहे.
हे ही वाचा :