मोदींनी काश्‍मिरी जनतेच्या मनातून तिरंग्याबद्दलचे प्रेम संपवले : राहुल गांधींचा आरोप | पुढारी

मोदींनी काश्‍मिरी जनतेच्या मनातून तिरंग्याबद्दलचे प्रेम संपवले : राहुल गांधींचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते २० लोकांसोबत लाल चौकात तिरंगा फडकावला होता. मोदींनी काश्मिरी जनतेच्या मनामधून तिरंग्याबद्दलचे प्रेम संपवले; पण आम्ही हजारो लोकांच्या उपस्थितीत लाल चौकात तिरंगा फडकावून तिरंग्याची भावना काश्मिरी तरूणामध्ये रुजवली. लोकांनी स्वयंस्फूर्तीने तिरंगा फडकावला, असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी सांगितले. छत्तीसगडमधील रायपूरमधील काँग्रेसच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज (दि.२६) समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, “कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. या यात्रेतून खूप काही शिकता आले. लाखो शेतकऱ्यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग होता. लाखो लोक यात्रेतून चालले. त्यांच्याशी माझा संपर्क झाला. गळाभेट झाली.  दुखापतीमुळे चालणे अवघड झाले होते. परंतु भारत मातेच्या आशीर्वादामुळे यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाली.”

५२ वर्षांनंतरही माझ्याकडे स्वत:चे घर नाही. श्रीनगरमध्ये पोहोचेपर्यंत मी मौनात गेलो. यावेळी अनेक अनुभव आले. दोन हजार लोकांची अपेक्षा असायची, पण ४० हजार लोक यात्रेत असायचे. भारताला समजून घेण्यासाठी माझी पदयात्रा होती. पदयात्रेत लोकांशी सतत संवाद सुरू ठेवला. भारत जोडो यात्रेत लोकांकडून काय काय ऐकले हे मी सांगू शकत नाही. आधी शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करायचो, यात्रेनंतर मी शेतकऱ्यांचे ऐकायला लागलो, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

हेही वाचा 

Back to top button