Shashi Tharoor tweet : हम साथ साथ है…शशी थरुर यांचे फोटो शेअर करत सूचक ट्विट

Shashi Tharoor tweet
Shashi Tharoor tweet

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मल्लिकार्जून यांच्या कार्यालयात थोड्या गप्पा मारण्यासाठी जमलो. त्यांना पाठिंबा आणि सहकार्य देण्याचे वचन दिले.."असं लिहित कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष निवडणुकीतील मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी एक फोटो सहित सूचक ट्विट (Shashi Tharoor tweet) केले आहे. आज मल्लिकार्जुन खर्गे यांनी  काँग्रेस पक्षाध्यक्षाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी फोटो शेअर करत हे सूचक ट्विट केले. वाचा सविस्तर बातमी. 

Shashi Tharoor tweet
Shashi Tharoor tweet

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा उपस्थित होते.

त्याचबरोबर  सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले होते. (Congress president Mallikarjun Kharge)

Shashi Tharoor tweet : पाठिंबा आणि सहकार्य राहील 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष निवडणुकीतील मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरुर  यांनी एक फोटो सहित सूचक ट्विट  केले आहे. ट्विट करत त्यांनी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबतचा आपला फोटो शेअर करत म्हटलं आहे, "मल्लिकार्जून यांच्या कार्यालयात थोड्या गप्पा मारण्यासाठी जमलो. त्यांना पाठिंबा आणि सहकार्य देण्याचे वचन दिले.." या ट्विटपूर्वी त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी खर्गे यांना नव्या पदभार कर्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news