Indian Rupee : नोटांवर गांधींसोबत ‘लक्ष्मी व गणपती’चेही फोटो छापा – अरविंद केजरीवाल | पुढारी

Indian Rupee : नोटांवर गांधींसोबत 'लक्ष्मी व गणपती'चेही फोटो छापा - अरविंद केजरीवाल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Indian Rupee : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचेही फोटो छापा, असे सुचवले आहे. नवीन छापल्या जाणा-या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Indian Rupee : केजरीवाल म्हणाले, रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले आहेत. ज्यात अधिक शाळा, रुग्णालये बांधणे आणि देशातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आदींचा समावेश आहे.

Indian Rupee : मात्र, अनेक वेळा आपण चांगले प्रयत्न करूनही आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देवाच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. मी लक्ष्मीपूजन करत असताना माझ्या डोक्यात हा विचार आला.

Indian Rupee : गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमात उमटत आहेत. आम आदमी पार्टीने हे हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे, असे लोकांमधून बोलले जात आहे.

केजरीवाल यांचे यू-टर्न – भाजप नेते, सांबित पात्रा

अरविंद केजरीवाल यांचे राजकारण आता यू-टर्न घेत आहे… तो तोच माणूस आहे ज्याने अयोध्येच्या राम मंदिरात जाण्यास नकार दिला होता, देव तेथे केलेल्या प्रार्थना स्वीकारणार नाही, असा दावा करत होता… तो तोच माणूस आहे ज्याने हसून सगळी हद्दपार केली होती. संसदेत काश्मिरी पंडित खोटे बोलतात.

Ramdas Athawale VS Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांच्या ढोंगीपणाला बळी पडू नका : रामदास आठवले

गुजरातमधील पराभवाच्या भीतीने आम आदमी पक्षाला चिरडण्याचा प्रयत्न : अरविंद केजरीवाल यांची टीका

Back to top button