पुढारी ऑनलाईन डेस्क : "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जनतेतून सतत टीका होणारे पहिले राज्यपाल आहेत. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तसेच कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करु, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना कोल्हापूरमध्ये केले. (Sharad Pawar News)
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सत्ता हाती आहे म्हणून तुरुंगात टाकण्याची, शिव्या देण्याची भाषा राजकारणी म्हणून योग्य नाही. "सत्ता हाती आल्यावर पाय जमिनीवर असायला हवेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करु. मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जातो. शिवसेनेत फूट पडली हे खरं आहे पण कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच आहे."
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन बोलत असताना ते म्हणाले, "महाराष्ट्राला परंपरा आहे. अनेक चांगले राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखी अनेक नावं यात घेता येतील. जे जे महाराष्ट्रात राज्यपाल झाले त्यांनी निपक्षपणे काम केले आहे. लोकांमध्ये चर्चेत राहणारे आणि जनतेतून सतत टीका होणारे भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत. राज्यपाल हे पद एक महत्तवपूर्ण पद आहे. पण राज्यापाल सतत आक्षेपार्ह विधान करत असतात. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. असे ते म्हणाले. भारत जोडो यात्रेबाबत बोलत असताना म्हणाले, भाजपने राहुल गांधीची टिंगल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या यात्रेत विविध पक्षांसह सर्वसामान्य जनताही सहभागी झाली होती.
अमित शहा यांनी राम मंदीर २०२४ पूर्वी बांधून पूर्ण होणार असल्याचं म्हंटल आहे. यावर बोलत असताना ते म्हणाले, खऱ्या प्रश्नावरुन लक्ष वळवण्यासाठी राम मंदीराचा मुद्दा निर्माण केला जात आहे. राज ठाकरे आरोप केला होता की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाल्यापासून जातीयवाद निर्माण झाला. यावर बोलताना ते म्हणाले,"आम्ही शाहू, फूले आंबेडकर यांच्या विचारांचे आहोत.
हेही वाचा