एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Vs Sanjay Raut) | पुढारी

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Vs Sanjay Raut)

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहेत. त्यामुळे ते निवडून आले आहेत, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील  (Gulabrao Patil Vs Sanjay Raut) यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

जळगावात आज (दि.७) हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी मंत्री पाटील (Gulabrao Patil Vs Sanjay Raut) यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी शिंदे गटाचा कुणीही आमदार, खासदार निवडून येणार नाही, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, ” संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहेत. त्यामुळे ते निवडून आले आहेत.”

“ज्यातील ग्रामीण भागात धर्मांतरणाचे काम जोरात सुरु आहे. आम्ही कुणाच्याही धर्मावर बोट ठेवत नाही. मात्र आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास सहन करणार नाही. आज मी मंत्री किंवा आमदार आहे. यापेक्षा मी हिंदू आहे, हे महत्त्‍वाचे आहे. खूर्चीपेक्षा धर्म महत्त्‍वाचा आहे. आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही. याचा अर्थ असा नाही की, कुणीही आमच्यावर चालून यावे, हिंदू धर्माविरुध्द कारस्थान केल्यास सडेतोड उत्तर देणार,” असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी  दिला.

हेही वाचा :  

Back to top button