Shampoo : शाम्पूचा वापर करताय? तर ‘या’ गोष्टी समजून घ्या…

Shampoo : शाम्पूचा वापर करताय? तर ‘या’ गोष्टी समजून घ्या…

शाम्पूचा वापर कशासाठी केला जातो? तर डोक्यावरी जास्तीचा तेलकटपणा, जमलेली धूळ, चिकटलेले अन्य पदार्थ हे काढून डोके व केस स्वच्छ करणे हे आहे; पण आता केवळ स्वच्छता हे ध्येय न राहता शाम्पू या उत्पादनाचे पर्यावसान एका बहुउद्देशीय प्रसाधानात झाले आहे.
प्राथामिक स्वरूपात बघितल्यास शाम्पूने केस धुतल्यावर ते गुळगुळीत, चमकदार, स्वच्छ, फार कोरडे न होता तेलविरहीत, न गुंतणारे होणे अपेक्षित आहेत. या निकषांवर शाम्पू उतरला तरतो चांगला म्हणावा. बरेच वेळा शिकेकाई विरुद्ध शाम्पू असे वाद चालतात. आई व मुलींमध्ये शिकेकाई ही भारतीय परंपरा तर शाम्पू ही पाश्चात्त्य संकल्पना असे रूढ झाले आहे. (Shampoo )

Shampoo : 1939-40 मध्ये  बाटलीबंद शाम्पू 

1939-40 मध्ये प्रथमच बाटलीबंद शाम्पू बाजारात आला. केस स्वच्छ करून त्यातील चिकटपणा काढणारे साधन म्हणून ते प्रथम वापरात आले. शाम्पू साठवायला व वापरायला सोपा आहे. साबणाने येणारा कोरडेपणा शाम्पूने येत नाही; पण तत्पूर्वी केस धुण्यासाठी उत्तम अशी शिकेकाई व्यतिरिक्त अन्य नैसर्गिक साधने आपण बघूया. सर्वात सोपे म्हणजे दूध नासवून त्याच्या पाण्याने केस धुवावेत. एक कप दूध उकळून, उकळत असताना त्यात एक चमचा व्हिनेगर घालावे. खाली उतरवून फडक्याने गाळावे व या पाण्याने केस धुवावे किंवा अर्धा ते एक चमचा साधा सोडा केस धुण्यासाठी वापरावा.

वेळेअभावी सर्वांना शिकेकाई वापरण आणि करणं शक्य नसतं. म्हणून शाम्पू हा सुरुवातीला स्वच्छतेचे साधन म्हणून बाजारात आला; पण 1955 च्या सुमारास एका सर्वेक्षणामध्ये लक्षात आले की, बायकांना शाम्पूकडून अजून बर्‍याच अपेक्षा आहेत. त्या म्हणजे स्वच्छता, केसांना चकाकी, केस फार कोरडे होता कामा नयेत; पण तेलकटही दिसायला नकोत. केस विंचरायला सोपे जावेत. सैरभैर उडू नयेत व केसांना मंद सुगंध यावा. काही वेळा फेस जास्त झाला की शाम्पूची क्वालिटी उत्तम असा समज होतो; पण याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. फक्त फेसावरून आपण किती शाम्पू वापरायचा, हे समजू शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news