Life Style-Fashion Trends : धोती जंपसूट, पारंपारिक भारतीय पेहरावाचा Modern अवतार! | पुढारी

Life Style-Fashion Trends : धोती जंपसूट, पारंपारिक भारतीय पेहरावाचा Modern अवतार!

पुढारी ऑनलाइन डेस्क : (Life Style-Fashion Trends) तुमचं Life Style एकदम कूल असावं असं तुम्हाला वाटतं का? कुठेही एखाद्या पार्टीत जाण्यासाठी झटपट तयार व्हायचे आहे आणि अगदी हटके लूक तुमचा असावा असं वाटतं ना? मग तुम्हाला (Life Style-FashionTrends) विषयी जाणून घ्यायलाच हवं. तेव्हाच तुम्ही तुमची एक युनिक पर्सनालिटी क्रिएट करू शकता. सध्याच्या आपल्या या धावपळीच्या युगात आपल्याला सगळ्या गोष्टी झटपट करता यायला हव्या. त्यामध्ये अनेकदा आपले पारंपारिक भारतीय पेहराव सुंदर तर दिसतात मात्र वेळखाऊ असतात. त्यामुळे दररोजच्या जीवनात आपल्याला ते घालता येत नाही. पण सध्या Fashion Industry च्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावल्या आहेत. त्यामुळेच ती तुमच्या सोयीचा आणि लूकचा दोन्हींचा विचार करून नवनवीन कलेक्शन्स लाँच करतात. त्यामुळेच सध्या आउट ऑफ बॉक्स जाऊन एक हटके Fashion Trend मार्केटमध्ये दिसत आहे तो म्हणजे ‘धोती जंपसूट’.

धोती हा एक पारंपारिक भारतीय पेहराव आहे. महिला साडीमध्ये काष्टा नेसतात. तर पुरुष धोती घालतात. धोती हा अनेक प्रकारे सुटसुटीत आणि आरामदायी पेहराव आहे. मात्र, पारंपारिक पद्धतीने धोती घालायला वेळ मात्र लागतो. तर महिलांना काष्टासाठी नेसण्यात वेळ लागतो. जे आजच्या धावपळीच्या युगात शक्य नाही. तसेच वेस्टर्न स्टाइलच्या प्रभावामुळे हे पेहराव मागे पडले. अनेकांच्या घरात मुलींना जीन्स घालणे आजही सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही, असे मानले जाते. तर या सर्वांवर उपाय म्हणून मध्यंतरी या धोतीला पँटच्या स्वरुपात आणण्यात आले होते. धोती पँट आणि कुर्ता हे एक स्टाईल स्टेटमेंट झाले होते.

त्याची आता पुढची पायरी म्हणजे धोती जंपसूट (Life Style-FashionTrends)मार्केटमध्ये आले आहेत. जे एकदम कूल आणि हटके वाटतात. हे एक सुंदर इंडोवेस्टर्न कॉम्बिनेशन आहे. जे कोणत्याही प्रकारच्या पार्टीत तर वापरू शकतातच तसेच दररोज ऑफिससाठी देखिल घालू शकतात. त्यामुळेच धोती जंपसूट ही संकल्पना पारंपारिक भारतीय पेहरावाचा Modern अवतार आहे. जो अगदी आजच्या Life Style ला सुसंगत होतो.

धोती जंपसूटची वैशिष्ट्ये (Life Style-FashionTrends)

हे अनेक प्रकारच्या मटेरियलमध्ये उपलब्ध आहेत. रेशिम, कॉटन, एनथिक वेअर, जॉर्जेट, पॉलिस्टर अशा सर्व प्रकारच्या कापडांमध्ये हे उपलब्ध आहेत.

हे पार्टीवेअर आणि सेमी फॉर्मल आहेत त्यामुळे तुम्ही अगदी पार्टीला हटके कूल लूकसाठी याचा वापर करू शकतात. तसेच ऑफिसमध्येही घालून जाऊ शकता.

सुटसुटीतपणा हे आणखी एक वैशिष्ट्य. तुम्हाला अगदी धावता-धावता बस पकडायची असो किंवा मुंईची लोकल धावपळ करण्यासाठी हा ड्रेस खूप सुटसुटीत आहे.

यामध्ये नंबर ऑफ व्हरायटी आणि डिझाइन्स तुम्हाला भेटू शकतात.

काही-काही जंपसूट हे सुंदर स्टायलिश जॅकेटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे नाईट पार्टीत तुम्ही अगदी उठून दिसाल.

मग, विचार कसला करत आहात. आपल्या कपड्यांच्या स्टॉकमध्ये या न्यू Fashion Trend मधील निदान दोन-तीन व्हरायटीजचे कलेक्शन असायलाच हवे. बरोबर ना…

हे ही वाचा :

Life Style : आळस कसा दूर करावा? जाणून घ्या ‘या’ अगदी सोप्या पद्धती

Life Style : तुम्हाला खूप जास्त विचार करायची सवय आहे का? मग ‘या’ गोष्टी करून पाहा…

Back to top button