Health lifestyle : रात्री झोपण्‍यापूर्वी 'या' टिप्‍स फॉलो करा, मस्‍त निरोगी जगा | पुढारी

Health lifestyle : रात्री झोपण्‍यापूर्वी 'या' टिप्‍स फॉलो करा, मस्‍त निरोगी जगा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजच्‍या धावपळीच्‍या जगण्‍यामध्‍ये आपणं निरोगी आयुष्‍य जगतो का, या प्रश्‍नाचे उत्तर बहुतांशवेळा नकारार्थी येण्‍याची शक्‍यता अधिक असते. कारण जगण्‍याचा वेगच एवढा वाढला आहे की, सर्वच वयोगटात त्‍याचा ताण दिसू लागला आहे. ( Health lifestyle ) त्‍यामुळे दिर्घायुषी होण्‍याबरोबरच निरोगी आयुष्‍यासाठी महत्त्‍वाची माहिती आपल्‍याला असणे गरेचजे असते. फिटनेस एक्सपर्ट Dan Go यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून काही हेल्थ टिप्स दिल्‍या आहेत. त्‍याविषयी जाणून घेवूया…

चुकीच्‍या जीवनशैलीचे गंभीर परिणाम आपल्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर होत असतात. अलिकडे तरुण वयात होणार्‍या गंभीर आजाराबाबत ऐकलं तरी सर्वांनाच आपल्‍या आरोग्‍याविषयी चिंता वाटणे सुरु होते. निरोगी आरोग्‍यासाठी चांगली झोप, योग्‍य आहार, व्‍यायाम आणि ताणतणावपासून दूर राहत तुम्‍ही तुमची प्रतिकार शक्‍ती वाढवू शकता.

Health lifestyle : 3-2-1 पद्‍धतीची अंमलबजावणी करा

Dan Go यांनी म्‍हटलं आहे की, झोपण्‍यापूर्वी 3-2-1 या पद्‍धतीचा वापर करण्‍याचे लक्षणीय फायदे आहेत. झोपण्‍यापूर्वी ३ तास आधी तुम्‍ही जेवण घ्‍या. या नियमांचे पालन केल्‍यास तुम्‍हाला गाढ झोप येण्‍यास मदत होते. झोपण्‍यापूर्वी दोन तास पाणी किंवा कोणतेही द्रव्‍य पदार्थाचे सेवन करु नका. तसेच एक तास मोबाईल फोन, टीव्‍हीपासून लांब राहा. याचा अर्थ झोपण्‍यापूर्वी एक तास आधी मोबाईल फोन, टीव्‍ही याचा वापर पूर्णपणे बंद करा. 3-2-1 ही पद्‍धत तुम्‍हा फॉलो केली तर निश्‍चित याचे दीर्घकाळ सकारात्‍मक परिणाम होतात.

व्‍यायाम, आहार आणि दीर्घश्‍वसन

तुम्‍ही तुमच्‍या दिवसाची सुरुवात व्‍यायामाने केल्‍यास याचा सकारात्‍मक परिणाम तुमच्‍या संपूर्ण दिवसावर होतो. दिवसभर तुम्‍ही तुमची कामे ही उत्‍साहाने पार पाडता. तसेच दिवसाच्‍या आहाराची सुरुवात तुम्‍ही प्रोटानच्‍या सेवनाने करा. तसेच दिवसभरात काही मिनिटे दीर्घ श्‍वसन करा. यामुळे तणाव कमी होण्‍यास मदत होते. तसेच शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी वाढते. तसेच रात्री झोपही गाढ लागते. चला तर मग फिटनेस एक्सपर्ट Dan Go यांनी दिलेल्‍या हेल्‍थच्‍या टिप्‍स फॉलो करा आणि निरोगी आयुष्‍याचा जगण्‍याचा संकल्‍प करा.

हेही वाचा : 

 

 

Back to top button