Life Style : जीन्स कोठून आली? | पुढारी

Life Style : जीन्स कोठून आली?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style : जीन्स पँट वापरणे हा आपल्या Life Style एक अविभाज्य भाग बनला आहे. पाश्चिमात्य पोशाखाला आपल्या समाजाने स्वीकारले असले तरी अजूनही अनेक अतिरेकी विचारांचे संस्कृती रक्षक जीन्सला नाकारतात. विशेषतः महिलांनी जीन्स परिधान करणे अनेक समाजात किंवा घरात असभ्य पणाचे लक्षण मानले जाते. या विवादात अडकलेली असतानाही तरुणाईने मात्र, या जीन्सला आपल्या Life Style मध्ये स्वीकारलेच नाही तर तिला एक फॅशन स्टेटमेंट बनवले आहे. पण तुम्हाला जीन्स नेमकी कोठून आली? तिचा मूळ उगम कोठून आहे. एवढेच नाही तर या जीन्सला अमेरिकेतही खूप विरोध सहन करावा लागला हे माहिती आहे? चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या लेखात वाचू…

Life Style : जीन्स भारतीयच आहे!

वाचून आश्चर्यच वाटेल पण जीन्सचे मूळ भारतीयच आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणी जीन्स घालण्यासाठी विरोध करत असेल तर तुम्ही त्याला जीन्स देखिल भारतीयच आहे, असे ठणकावून सांगू शकता. 16 व्या शकतात अनेक बदल होत होते. युरोपच्या साम्राज्यवादी विस्तार धोरणामुळे भारतातही आक्रमणे सुरूच होती. या दरम्यान मुंबईतील डोंगरी किल्ला किंवा डोंगरी गावाजवळ काही कामगार जाड्या भरड्या प्रकारातील सूती कापड विनत असत. नंतर या कापडाला नीळमध्ये रंगवून विकण्यात येत असे. त्यामुळे तिला डुंगारी असे नाव पडले. म्हणूनच सुरुवातीच्या काळात ‘डंगरी’ हा पोशाख अस्तित्वात आला. अजूनही डंगरी लोकप्रिय पोशाख आहे. त्यावेळी नाविकांनी याचा उपयुक्त पोशाख म्हणून स्वीकार केला. पोर्तुगिज, फ्रान्स, डच व्यापा-यांनी तिला सातासमुद्रापलीकडे नेले.

Life Style : आज जाणून घेऊ, नकारात्मक विचारांना कसे रोखावे?

नंतर याच डुंगारीमध्ये बदल करून जीन्सचे कापड 1600 च्या सुरुवातीच्या काळात ट्यूरिनजवळील इटालियन शहर चियारी येथे तयार केले गेले. हे शक्तिशाली नौदलासह स्वतंत्र प्रजासत्ताकची राजधानी जेनोवाच्या हार्बरद्वारे विकले गेले. हे फॅब्रिक जेनोआच्या नौदलाच्या खलाशांची पँट बनवणारा पहिला होता, कारण त्याच्या खलाशांना कोरड्या किंवा ओल्या परिधान करता येतील अशा पँट हव्या होत्या आणि जहाजाच्या डेकची साफसफाई करताना त्याची पँट दुमडली जाऊ शकते. या जीन्स एका मोठ्या जाळ्यात बांधून समुद्राच्या पाण्याने धुतल्या गेल्या आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना ब्लीच करून पांढरे केले. अनेक लोकांच्या मते, जीन्सचे नाव यहोवाच्या नावावरून पडले आहे. जीन्स बनवण्याचा कच्चा माल फ्रान्समधील निम्स शहरातून आला होता, ज्याला फ्रेंचमध्ये डी निम असे म्हणतात, म्हणून त्याच्या कापडाचे नाव ‘डेनिम’ पडले.

Life Style : अमेरिकेत सुद्धा झाला होता विरोध!

त्यानंतर व्यापाराच्या माध्यमातून ही जीन्स अमेरिकेत गेले. त्यावेळी अमेरिकेत खाणीत काम करणा-या मजुरांसाठी त्या विशेष करून बनवण्यात आल्या होत्या. अनेक दिवस मजुरांसाठीचा पोशाख म्हणूनच जीन्सकडे पाहण्यात येत होते. मात्र नंतरच्या काळात अमेरिकेतील तरुणाईला हे कापड आणि पँट अत्यंत यूजर फ्रेंडली वाटले. त्यामुळे किशोरवयीन मुलांना आणि तरुणांवर जीन्सने मोहिनी घातली. मात्र, त्यावेळी देखिल अमेरिकेतील उच्चभ्रू समाजाने या जीन्सची मोठ्या प्रमाणात हेटाळणी केली होती. मात्र, तरुणांमध्ये याची क्रेझ वाढत गेली. नंतर हॉलिवूडच्या स्टार्सने जीन्स परिधान करायला सुरुवात केली. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. पाहता-पाहता जीन्स ही स्टाइल स्टेटमेंट बनली.

Life Style : भारतात आल्यानंतर विरोध

स्वातंत्र्यानंतर चित्रपटांचा भारतात विकास झाला. चित्रपटाच्या माध्यमातून जीन्स ही हळूहळू भारतीय समाजात शिरली. मात्र, पाश्चिमात्य पोशाख म्हणून जीन्सचा भारतीय समाजात तीव्र विरोध झाला. अजूनही होतो. तरीही या विरोधाला डावलून जीन्सने आपल्या कपाटात खास जागा निर्माण केली आणि आज आपल्या Life Style चा एक अविभाज्य भाग बनली.

हे ही वाचा :

Life Style : आळस कसा दूर करावा? जाणून घ्या ‘या’ अगदी सोप्या पद्धती

Life Style : तुम्हाला खूप जास्त विचार करायची सवय आहे का? मग ‘या’ गोष्टी करून पाहा…

Back to top button