Share Market Closing Bell | विक्रमी उच्चांकानंतर बाजारात सुस्ती! सेन्सेक्स ७३,९०३ वर बंद, स्मॉल, मिडकॅप तेजीत

Share Market Closing Bell | विक्रमी उच्चांकानंतर बाजारात सुस्ती! सेन्सेक्स ७३,९०३ वर बंद, स्मॉल, मिडकॅप तेजीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमवारच्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागला. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ११० अंकांनी घसरून ७३,९०३ वर बंद झाला. तर निफ्टी ८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,४५३ वर स्थिरावला. (Share Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर रियल्टी, मेटल, ऑईल आणि गॅस, मीडिया, पॉवर आणि ऑटो प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. तर आयटी आणि टेलिकॉम निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप १.१ आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

संमिश्र जागतिक संकेत आणि प्रॉफिट बुकिंगमुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात काही प्रमाणात घसरण दिसून आली. तसेच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीला विलंब होणार असल्याच्या शक्यतेचे कारणही बाजारातील दबावाला कारणीभूत ठरले.

सेन्सेक्सवर एचसीएल टेक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले. तर एम अँड एम, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, कोटक बँक, एचसीएल टेक, आयसीआयसी बँक, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर टाटा कन्झ्यूमर, एम अँड एम, बीपीसीएल, बजाज ऑटो, अदानी पोर्ट्स हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स वधारले

टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये आज सुमारे ६ टक्क्यांची वाढ झाली. पुणे, बंगळूर आणि चेन्नई येथे ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि आयटी डेव्हलपमेंट हब स्थापन करण्यासाठी BMW समूहासोबतच्या संयुक्त उपक्रम करारानंतर टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स वधारले. दरम्यान, एनएसईवर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स ४ टक्के वाढीसह १,०९२ रुपयांवर होता. (Tata Technologies Share Price)

अदानी पोर्ट्सचा शेअर्सही वधारला

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चा शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी वाढला. NSE वर हा शेअर्स उच्चांकी १,४२४ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर तो २ टक्के वाढीसह १,४०४ रुपयांवर स्थिरावला. गेल्या आठ सत्रात हा शेअर्स १४ टक्क्यांनी वाढला आहे. (Share Market Closing Bell)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news