लाखो गुरांचा बळी घेणाऱ्या Lumpy Skinचा उद्रेक कसा झाला? संशोधकांनी शोधले उत्तर

लाखो गुरांचा बळी घेणाऱ्या Lumpy Skinचा उद्रेक कसा झाला? संशोधकांनी शोधले उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत मे २०२२पासून आतापर्यंत १ लाख गुरांचा मृत्यू लंपी स्कीन या आजारामुळे झालेला आहे. तर जवळपास २० लाख गुरांना या आजाराची लागण झाली होती. या आजाराचा भारतात उद्रेक का झाला, याचे कारण शोधण्यात संशोधकांना अखेर यश आलेले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संशोधक उत्पल टाटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लंपी स्कीनच्या विषाणूचा अभ्यास करून हे संशोधन केले आहे. जीनोम सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर करून लंपी स्कीनच्या विषाणूच्या डीएनएवर संशोधन केल्यानंतर संशोधकांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.

या संशोधकांनी Whole Genome Sequencing या तंत्राचा वापर करून लंपी स्किन डिजिस व्हायरस (LSDV)चा अभ्यास केला. यात असे लक्षात आले की भारतात LSDVचे दोन व्हॅरिएंट पसरले आहेत. यातील जो पहिला व्हॅरिएंट आहे, तो आतापर्यंत झालेल्या स्थानिक उद्रेकांशी साधर्म्य साधणारा आहे. तर दुसऱ्या व्हॅरिएंटमध्ये गूणसूत्रांच्या पातळीवर बरेच बदल झालेले दिसून आले आणि हा व्हॅरिएंट रशियात २०१५ला झालेल्या उद्रेकातील व्हायरसशी साधर्म्य साधणारा आहे. LSDV हा डीएनए व्हायरस आहे आणि सहसा डीएनए व्हायरस अधिक स्थीर असतात, त्यामुळे त्यांच्यात फार बदल होत नाहीत. त्यामुळे या व्हायरसमध्ये झालेला बदल हा संशोधकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. हे बदल जवळपास १८००च्या जवळपास आहेत, त्यामुळे या आजाराचा भारतात उद्रेक झाला असावा, असे संशोधक मानतात.  या संशोधनामुळे लंपी स्कीनवर भविष्यात लस विकसितक करण्यात संशोधकांना फायदा होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news