Ram Mandir inauguration | जय श्री राम! नागपूरमधील विद्यार्थी राम भजनात दंग, नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Ram Mandir inauguration | जय श्री राम! नागपूरमधील विद्यार्थी राम भजनात दंग, नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी नागपूरमधील शालेय विद्यार्थ्यांचा श्री राम भजनावर नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. त्यात शिक्षिकेसोबत विद्यार्थी रामभजनात दंग होऊन नाचताना दिसत आहे. (Ram Mandir inauguration)

देश महत्त्वपूर्ण या धार्मिक सोहळ्याची तयारी करत असताना विद्यार्थी आणि शिक्षकाच्या राम भजनावरील नृत्याने उत्सवाच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश, विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी अयोध्येत पोहोचल्यावर नेपाळमधील भाविक श्री रामभजन गाताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या 

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चंदीगडमध्ये १५० क्विंटल लाडू बनवण्याची तयारी सुरू आहे.

श्री रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक काल शुक्रवारी समोर आली होती. सर्व विधी पार पडल्यानंतर दशावतारी प्रभावळ असलेली श्री रामलल्लाची ४.५ फुटांची (५१ इंच) ही अत्यंत लोभस अशी बालस्वरूप मूर्ती आहे. प्रभावळीत विष्णूचे १० अवतार कोरण्यात आले आहेत. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. प्राणप्रतिष्ठादिनी २२ जानेवारीला ती उघडण्यात येईल. (Ram Mandir inauguration)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news