पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील बटियागड गावातील एका संताने १९९२ मध्ये घेतलेली अनोखी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमणा सुरू केली आहे. संत बद्री बाबा आपल्या डोक्याने राम रथ ओढत अयोध्येकडे पायी निघाले आहेत. यासाठी त्यांना ५६६ किमी अंतर कापावे लागणार आहे. हिंदू संघटनांकडून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले जात आहे. Saint Badri
कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावरून त्यांनी ही रथयात्रा काढली आहे. बद्रीप्रसाद विश्वकर्मा उर्फ ब्रदी बाबा ११ जानेवारीरोजी बटियागड येथून रथाची डोक्याभोवती दोरी बांधून पायी निघाले होते. २२ जानेवारीला ते ५६६ किलोमीटरचे अंतर कापून अयोध्येला पोहोचतील. Saint Badri
प्रवासात सर्वत्र मला खूप प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. त्यामुळे एक नवीन ऊर्जा संचारली आहे. आता मला खूप आनंद मिळत आहे. राम मंदिराच्या उदात्त कार्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा भावना ब्रदी बाबा यांनी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी हिंदू जागरण मंचचे जिल्हा निमंत्रक अंकित राजपूत, विजय तिवारी, नीरज गुप्ता, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज शिवहरे, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार गोस्वामी, मनोज देवलिया आदी उपस्थित होते.
डोक्यावरून राम रथ ओढत अयोध्येला जाणारे बद्री बाबा म्हणाले की, करोडो राम भक्तांप्रमाणे मीही अयोध्येत राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार आहे. राम मंदिराच्या उभारणीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे मी निराश आणि दुःखी झालो होतो. १९९२ मध्ये मी शपथ घेतली होती की, जेव्हाही रामाचे भव्य आणि दिव्य राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा रामरथ वेणीत बांधून पायीच अयोध्येला जायाचे. आता दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी अयोध्येला जात आहे.
बद्री बाबा मध्य प्रदेशातील बटियागड गावात असलेल्या हनुमान मंदिरात मुक्काम करतात आणि पूजा करतात. लहानपणापासून ते आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या झोपडीत राहत आहेत. डोक्याला राम रथ बांधून तो दररोज ५० ते ५५ किमीचा प्रवास करत आहे. ते दिवसांतून एकदा डाळ आणि रोटी असलेले साधे अन्न खातात. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा ५०० वर्षांनी होत आहे. यापेक्षा चांगला क्षण असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हेही वाचा