Ram Mandir : राम मंदिराचे सॅटेलाइटवरून घेतलेले फोटो इस्रोने केले शेअर

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्या अयोध्येत भव्य मंदिरात श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची देशात जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासह जगभरातील सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेध लागले आहेत. पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपायला केवळ एक दिवस उरला आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या स्वदेशी उपग्रहांच्या मदतीने अंतराळातून राम मंदिराची छायाचित्रे टिपली आहेत.

रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटवरून घेतलेल्या या फोटोंमध्ये अयोध्येतील २.७ एकरमध्ये पसरलेली रामजन्मभूमी स्थळ पाहता येते. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचे हे चित्र इस्रोने गेल्या वर्षी १६ डिसेंबरला काढले होते. मात्र, त्यानंतर अयोध्येत दाट धुक्यामुळे इतर छायाचित्रे काढणे कठीण झाले होते. इस्रोने काढलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये दशरथ महाल आणि सरयू नदी स्पष्टपणे दिसत असून अयोध्येचे रेल्वे स्थानकही दिसत आहे. हे उल्लेखनीय आहे की सध्या भारताच्या अंतराळात ५० हून अधिक उपग्रह आहेत, त्यापैकी काहींचे रिझोल्यूशन एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संस्थेच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमधून ही छायाचित्रे क्लिक करण्यात आली आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news