पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासह जगभरातील सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेध लागले आहेत. पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपायला केवळ एक दिवस उरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी दुपारी १२.२० ते १ या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल. या आधी त्यांनी आज (दि.२१) राम सेतूचे मूळ ठिकाण अरिचल मुनईला भेट दिली.
तामिळनाडूतील धनुषकोडी येथील श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूजा केली. कोठंडाराम या नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम, असा आहे. यादरम्यान त्यांनी राम सेतूचे मूळ ठिकाण असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.
तामिळनाडूतील अरिचल मुनई पॉईंट येथून राम सेतू सुरू होतो. तिथे भगवान श्री राम यांनी रावणाचा पराभव करण्याचे व्रत घेतले होते. ही पवित्र माती जिथून प्रभू राम लंकेला गेले, ती भारताच्या लवचिकतेचे आणि कोणत्याही आव्हानावर विजय मिळवण्याच्या क्षमतेचे प्रतीक मानले जाते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी उद्या अयोध्येला जाणार असल्याने या भेटींना खूप महत्त्व आहे.
हेही वाचा :