न्‍यूझीलंडचे मंत्रीही राम नामात दंग, म्‍हणाले, “जय श्री राम…..”

न्‍यूझीलंडचे मंत्रीही राम नामात दंग, म्‍हणाले, “जय श्री राम…..”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिरात रामलल्‍लाच्‍या मूर्ती प्राणप्रतिष्‍ठेला अवघे काही तास उरले आहेत. या अभूतपूर्व सोहळा साजरा करण्‍यासाठी संपूर्ण देश राममय झाला आहे. अपूर्व उत्‍साहात सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी विविध देशातून निमंत्रक अयोध्‍येत दाखल झाले आहेत. ( Ram Lalla Pran Pratishtha ceremony )
राम नामात न्यूझीलंडचे मंत्री डेव्‍हड सेमोर दंग

रामलल्‍लाच्‍या प्राणप्रतिष्‍ठ सोहळ्यासाठी न्‍यूझीलंडचे मंत्री डेव्‍हिड सेमोर अध्‍योध्‍येत दाखल झाले आहेत. 'एएनआय'शी बोलताना ते म्‍हणाले की, "जय श्री राम… मी पंतप्रधान मोदींसह भारतातील सर्व जनतेचे त्यांच्या नेतृत्वासाठी अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी 500 वर्षांनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवार 22 जानेवारी रोजी सकाळी 10.55 वाजता श्री रामजन्मभूमी येथे आगमन होईल. 12:05 ते 12:55 या वेळेत अभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. दुपारी 1 वाजता सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेल. दुपारी 2:10 वाजता कुबेर टिळ्याला भेट देणार आहेत.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, 22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक क्षण आहे. माझ्यासारखे सर्व राम भक्त, कारसेवक आणि आंदोलक उद्याच्या तारखेची वाट पाहत आहेत. 22 जानेवारीचा उत्सव भव्य आणि दिव्य आहे. तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था पूर्ण केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news