अभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्यासमोर बल्‍ब झाला फटटट्…अन्…

अभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्यासमोर बल्‍ब झाला फटटट्…अन्…
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्‍क 

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावरही ॲक्‍टिव्ह असते. ती नवनवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपल्‍या चाहत्‍यांचे मनोरंजन करत असते. रविवारी सारासोबत एक अपघात घडला. याचा एक व्हिडिओ तिने शेअर  केला आहे. ज्‍या मध्ये साराच्या तोंडावर एक बल्‍ब फुटतो अन् साराची चांगलीच घाबरगुंडी उडते. या प्रकाराने सारा भयभीत झाल्‍याचे दिसून येत आहे.

सारा सोबत झाला अपघात…

साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्‍यामध्ये ती आरशासमोर मेकअप करत असल्‍याचे दिसून येत आहे. सारा आपल्‍या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेली आहे. मेकअप आर्टिस्‍ट तिला तयार करत आहे. यावेळी टीममधील एकजण काहीतरी बोलत आहे. यावेळी सारा जीतूला माझ्यासाठी नारळ पाणी आणायला सांग. इतक म्‍हटल्‍यावर साराची मेकअप आर्टिस्‍ट दुसरीकडे पलटते. इतक्‍यात अचानक साराच्या तोंडासमोर विजेचा बल्‍ब फुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी साराची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

विक्‍की कौशलसोबत साराचा नवा चित्रपट…

बल्‍ब फुटल्‍यावर सारा चांगलीच घाबरली. तिने आपले कान बंद करून आपले डोके लपवले. बल्‍ब फुटल्‍याच्या आवाजाने तिचे कान सुन्न झाले. मात्र तिला कोठेही इजा झाला नाही. साराने काही अशा प्रकारची माजी सकाळ होती हे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्‍ट केला आहे.

सारा अली खान सध्या इंदौर मध्ये आहे. ती विक्‍की कौशल सोबत नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्‍त आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरून विक्‍की आणि साराचे फोटो व्हायरल झाले होते. इंदोरच्या रस्‍त्‍यांवर दोघेही बाईकवरून फिरताना दिसले होते.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news