Allu Arjun : ‘पुष्पा’नंतर या ६ चित्रपटांद्वारे करणार पुन्हा धमाका - पुढारी

Allu Arjun : ‘पुष्पा’नंतर या ६ चित्रपटांद्वारे करणार पुन्हा धमाका

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) यशाच्या शिखरावर पोहचला आहे. सध्या सिनेमासृष्टीत फक्त अल्लू अर्जुन आणि त्याच्या पुष्पा चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. या यशानंतर तो एकापोठोपाठ एक असे तब्बल ६ चित्रपट घेऊन येत आहे. हे सर्व चित्रपट पॅन इंडिया रिलीज करण्याची तयारी अल्लू अर्जुनने केली आहे. हे चित्रपट ‘पुष्पा त प्रमाणे सुपरहिट ठरले तर तो पहिला पॅन इंडिया सुपर स्टार ठरु शकतो.

Allu Arjun

पुष्पा २ ( pushpa 2 )

पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) ‘पुष्पा २’ च्या तयारीमध्ये गुंतला आहे. या चित्रपटाचे शुटींग मार्च पासून सुरु होत आहे. या वर्षाच्या अखेरीस पर्यंत अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ पॅन इंडिया रिलीज करायचा आहे. असे झाले तर तो एका वर्षात दोन मोठे हिट देणारा स्टार ठरेल. चाहते या चित्रपटाची आत्तापासूनच वाट पहात आहेत.

Allu Arjun

आयकॉन (Icon)

पुष्पा २ नंतर अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) आयकॉन या चित्रपटाच्या तयारीत लागणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत पूजा हेगडे व कृती शेट्टी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पहायला मिळतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेणु श्रीराम हे करणार आहेत. या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुन वेणु श्रीराम यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे.

Allu Arjun

दिग्दर्शक बोयापती श्रीनु

आयकॉन नंतर अल्लू अर्जुन दिग्दर्शक बोयापती श्रीनु यांच्या सोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. ‘सरनायडू’ हा हिट चित्रपट दिल्यानंतर दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याचे निश्चित केले आहे. श्रीनु यांचा चित्रपटाचे काम आयकॉन नंतर सुरु होईल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

दिग्दर्शक प्रशांत नील

सध्या टॉलीवूडमध्ये एक मोठी बातमी पसरली आहे. की, केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील हे आपल्या आगामी चित्रपटात अल्लू अर्जुन याला घेण्यासाठी उत्सुक आहेत. केजीएफ चित्रपट सुद्धा पॅन इंडिया मोठा हिट ठरला होता. केजीएफ २ रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटाबाबत सुद्धा प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तर प्रशांत नील हे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी अल्लू अर्जुनसाठी आग्रही आहेत. अल्लू अर्जुनने देखिल एकत्र काम करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. सध्या प्रशांत नील हे अभिनेता प्रभास सोबत ‘सालार’ हा चित्रपट बनवत आहेत.

दिग्दर्शक कोरतल्ला शिवा

साऊथमध्ये मिर्ची, श्रीमानंथुडू, भारत ऐने नेनु आणि जनता गॅरेज सारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक कोरतल्ला शिवा हे देखिल अल्लू अर्जुन याच्या सोबत चित्रपट बनविण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांच्यात सध्या पटकथेला घेऊन चर्चा आहे. दोघांचे जुळून आले तर या चित्रपटाची निर्मितीसुद्धा लवकरच सुरु केली जाईल.

मुरुगदास

दरबार, सरकार, स्पायडर, अकिरा, हॉलिडे या सारखे चित्रपट दिग्दर्शन करणारे मुरुगदास हे सुद्धा अल्लु अर्जन याच्या सोबत चित्रपट बनवणार आहेत. सध्या ते चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. पण दोघांनी एकत्र काम करण्याचे निश्चित केले आहे.

 

Back to top button