School Students : “पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे” : राजेश टोपे | पुढारी

School Students : "पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे" : राजेश टोपे

जालना, पुढारी ऑनलाईन : “युरोपमध्ये कोरोनाची लाट असताना शाळा सुरू आहेत. राज्यातील रुग्णालयांमध्ये सुमारे ९५ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. या सर्वांचा अभ्यास करून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाचे नियम शाळेत पाळले जाणार असून पालकांनी मुलांना शाळेत (School Students) पाठवावे”, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

जालना येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजेश टोपे म्हणाले की, “युरोपमध्ये कोरोनाची लाट सुरू आहे. मात्र, तेथील शाळाही सुरू आहेत. शाळा सातत्याने बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या बौद्धिक आणि सर्वांगिण विकास करण्याचा हा प्रमुख कालावधी असतो. मुलांना घरी ठेवले तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे”, असेही टोपे यांनी सांगितले. (School Students)

“जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांच्या संख्येचा विचार करून स्थानिक प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. जर कोणी कोरोनाबाधित आढळले तर इतरांची तपासणी करून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे”, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसारच निर्बंध कमी करता येतील 

सध्या राज्यातील ९०-९५ टक्के बेड रिकामे असून आयसीयूचे बेड ९५ टक्के रिकामे आहेत. ९० टक्के कोरोनाबाधित गृहविलगीकरणात आहेत. टास्क फोर्सचा याबाबत विचार घेण्यात आला आहे. हाॅस्पिटलायझेशनचे प्रमाण कमी राहिले आहे. तर, सध्या लागू असलेलेल कोरोनाचे निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार कमी करता येऊ शकतील, असेही टोपे यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

हे वाचलंत का? 

Back to top button