सांगली : सायकलवरून पडल्याने संभाजी भिडे यांना दुखापत

संभाजी भिडे
संभाजी भिडे

सांगली ः पुढारी वृत्तसेवा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याने जखमी झाले. त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या ते सांगलीतील गणपती मंदिरकडे दर्शनासाठी सायकलवरून निघाले होते. ते मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सायकलवरुन उतरत असताना त्यांचे धोतर सायकलच्या सीटमध्ये अडकले. त्यामुळे ते खाली कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. संभाजी भिडे यांना उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भिडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी भारती हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news