सांगली : केवळ ६० दिवसांच्या बकऱ्याला तब्बल ३१ लाख रुपयांना मागणी !

सांगली : केवळ ६० दिवसांच्या बकऱ्याला तब्बल ३१ लाख रुपयांना मागणी !

आटपाडी ; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील माडग्याळ जातीच्या केवळ ६० दिवसांच्या बकऱ्याला तब्बल ३१ लाख रुपयांना मागणी झाली. बकऱ्याची ही किंमत ऐकून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले. आटपाडी येथे तानाजीराव पाटील यांचा वाढदिवस आणि शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात मंत्र्यांच्या हस्ते या बकऱ्याच्या गळ्यात हार घालण्यात आला. तसेच पशु पालकांचाही सन्मान करण्यात आला.

माणदेशी आटपाडी तालुक्यातील जातीवंत खिलार जनावरे आणि शेळ्या-मेंढ्याना अनेक वेळा अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. बाजार समितीच्या आवारात मेंढ्यांच्या यात्रेत काही जातीवंत मेंढ्यांना १ ते दीड कोटी रुपयांची मागणी झाली आहे. पैदाशीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बैल आणि मेंढ्यांना मोठी किंमत मिळते. डोक्यावर पोपटाच्या चोचीचा आकार असलेल्या बकऱ्यांना मोठी किंमत सांगितली जाते. प्रत्यक्ष व्यवहार झाला नाही तरी या बकऱ्यांचे मोल मोठे आहे.

मेळाव्यात जातीवंत बकरीच्या वंशावलीच्या ६० दिवसांच्या या छोट्या बकऱ्याला ३१ लाख रुपयांची मागणी झाली. प्रगतशील शेतकरी सुबराव पाटील आणि विलास पाटील यांच्या मालकीचा हा बकरा आहे. मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, प्रा.नितिन बानुगडे-पाटील, तानाजीराव पाटील यांनी या बकऱ्याच्या विक्रमी किंमतीबद्दल माहिती घेतली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेगळा छंद जोपासणाऱ्या या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news