पुढारी ऑनलाईन
ऊ अंटावा या गाण्यामुळे सामंथा (Samantha tatoos) रुथ प्रभू चांगलीचं चर्चेत आहे. नागा चैतन्य आणि सामंथा दोघेही २ ऑक्टोबर २०१ रोजी वेगळे झाले. दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. त्यांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली हाेती; पण, ऊ अंटावा या गाण्यानंतर चर्चा होतेय ती म्हणजे तिच्या टॅटूजची. (Samantha tatoos) हे टॅटू यासाठी खास आहेत की, तिचा एक्स पती नागा चैतन्यशी या टॅटूचं कनेक्शन आहे. हो. तुम्ही बरोबर वाचलात!
सामंथाने तिचे टॅटू फ्लॉन्ट केले होते. तिच्या मनगटावर एक टॅटू आहे, जो नागा चैतन्याच्या मनगटावरदेखील तसाच टॅटू पाहायला मिऴतो. तिच्या मनगटावर दोन बाण असणारा हा टॅटू आहे. हे रोमन चिन्ह आहे. त्याचा अर्थ होतो-'आपली ओळख स्वत: बनवा.'
याशिवाय, सामंथाच्या मानेच्या खालच्या बाजूला पाठीवर 'YMC' असं लिहिलेला दुसरा टॅटू दिसतो. द फॅमिली मॅन फेम सामंथाने तिचा हा टॅटू Ye Maaya Chesave या चित्रपटाला समर्पित केला आहे. हा चित्रपट तिच्यासाठी यासाठी खास आहे की, याचं चित्रपटावेळी दोघे सेटवर एकत्र भेटले होते.
तिसरा टॅटू तिच्या कंबरेच्या थोड्या वरच्या बाजूला आहे. येथे Chay असं लिहिलेलं दिसतं. Chay हे नागा चैतन्यचं उर्फ नाव असल्याचं म्हटलं जातं.
सामंथाने द फॅमिली मॅनमध्ये काम केले होते. यामध्ये मनोज वाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता तिचा आगामी चित्रपट Shaakuntalam ची प्रतीक्षा तिच्या फॅन्सना लागून राहिलीय. ती यामध्य देव मोहन सोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचलं का?