Gurmeet Choudhary : गुरमीत- देबिना यांच्या घरी ११ वर्षांनी हालणार पाळणा

Gurmeet Choudhary : गुरमीत- देबिना यांच्या घरी ११ वर्षांनी हालणार पाळणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; छोट्या पडद्यावरील गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांची जोडी रोमँटिक कपल मानली जाते. गुरमीत आणि देबिना यांनी तब्बल ११ वर्षांनी सोशल मीडियावर गुडन्यूज दिली आहे. यात त्यांनी दोघांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.

नुकतेच गुरमीतने ( Gurmeet Choudhary ) आपल्या इंन्स्टाग्रामवर आपला आणि पत्नी देबिना बॅनर्जी हिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेजण आनंदीत आणि रोमॉटिक लूकमध्ये दिसत आहेत. या फोटोतील खास म्हणजे, देबिना बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोला पोझ देताना दोघांनी एकसारखे ब्लॅक रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये गुरमीतने 'आम्ही आता दोघांचे तीन होणार आहोत, ज्युनियर चौधरी येत आहे, आपला सर्वाचा आशिर्वाद पाहिजे '. असे लिहिले आहे. यावरून चाहत्यांनी ते दोघेही लवकरच आई- बाबा होणार असल्याचे बोलले जात आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड कलाकारदेखील आपआपल्या कॉमेंन्टस करून दोघांना शुभेच्छा देत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने 'Oh my god, तुम्हचे हार्दिक अभिनंदन, तुम्हाला प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे ❤️ ❤️ ❤️…' असे लिहिले आहे. करण मेहरा यांने 'हार्दिक अभिनंदन भावा' असे लिहिले आहे.

याच दरम्यान अर्जुन बिजलानी यांनी 'बधाई हो गुरमीत.' तर हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये हार्ट वाला ईमोजी शेअर केला आहे. तर किश्वर मर्चेंटने 'तुमच्या दोघांना खूपसाऱ्या शुभेच्छा, तुम्हाला काही तरी आवश्यक असल्याचे कृपया मला सांगा.' असे म्हटले आहे. याशिवाय चाहतेदेखील अनेक कॉमेन्टस करत शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहत्यांनी हार्टचे ईमोजी शेअर केले आहेत.

गुरमीत आणि देबिना यांनी लग्नानंतर ११ वर्षांनी ही गुडन्यूज दिली आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून फोटो शेअर करत असतात. देबिना आणि गुरमीत पहिल्यांदा छोट्या पडद्यावरील 'रामायण' या मालिकेत एकत्रीत दिसले होते. या पौराणिक मालिकेत भगवान राम आणि माता सीता यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय तो 'नच बलिये' आणि 'पती पत्नी और वो' सारख्या रिॲलिटी शोमध्येही दिसला होता.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news