सलमान खानला स्वसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना

Salman Khan
Salman Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडू स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात आला आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सलमानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. या पत्रात "तुझा सिद्धू मुसेवाला करु," अशी धमकी देण्यात आली होती. बिश्नोई गँगकडूनही धमकी दिली असल्याचे सलमानने म्हटले होते. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. यापर्श्वभूमीवर सलमानने २२ जुलैला मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली हाेती. स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केली होती. आता मुंबई पोलीसांकडून त्याला आत्मसुरक्षेसाठी शस्त्र परवाना देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news