Sayali Sanjeev : तो केवळ माझा मित्रच; ऋतुराजबरोबरील रिलेशनशिपवर सायलीचा खुलासा

Sayali Sanjeev
Sayali Sanjeev

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री सायली संजीवचा ( Sayali Sanjeev ) आगामी 'हर हर महादेव' हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस घेवून येत आहे. या चित्रपटात ती महाराणी सईबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सायली संजीव 'हर हर महादेव' चित्रपटाच्या प्रमाशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान तिने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री सायली संजीवने ( Sayali Sanjeev ) नुकतेच प्रमोशनदरम्यान छोट्या पडद्यावरील 'बस बाई बस' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. या मंचावर अभिनेत्री सायली संजीव आणि शरद केळकर आणि अभिनेते सुबोध भावे यांची गंमतीशीर चर्चा रंगली. यावेळीच सायलीला रिलेशनशिप आणि प्रेमाविषयी काही विचारण्यात आले. या प्रश्नाची उत्तरे देताना सायलीने ऋतुराजसोबतच्या अफेवर मौन सोडत तो लहान असून, एक चांगला मित्र असल्याचे सांगितले.

यावेळी सायलीला मालिकेतील को-स्टारसोबत कधी सूत जुळलं का?, मालिकेतील को-स्टारसोबत नाव जोडलं गेलं होतं का?, शाळेत असताना तुला कोणावर प्रेम झालं होत का?, कोणाला तुझं कपाट आवरायला बोलवायचीस का?, विजांची भीती वाटते म्हणून मुलांना प्रपोज करायचीस काय? कपाट आवरण्याचा कंटाळा येतो म्हणून करायचीस का? यासारखे अनेक प्रश्न विचारण्यात आले. याच दरम्यान खास करून सुबोधने सायलीला मुद्दामहून क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सायलीने म्हणाली की, तो लहान असून माझा चांगला मित्र आहे. ऋतुराजला माझी 'काहे दिया परदेस' ही मालिका आवडत होती. त्यावेळी मला क्रिकेटरदेखील मालिका पाहातात म्हणून आश्चर्य वाटत होते.

त्यावर 'असेल तर मला प्लीज बॅट पाहिजे' असे शरद केळकर मिश्कीलपणे म्हणाला. यावर तिने सायली पुन्हा आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र असून त्यात रॉयल चॅलेंजर बँगलोर, चेन्नई सुपरकिंग्ज ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे हे असल्याचे म्हटलं आहे.

सायलीला खरी ओळख छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मिळाली. या मालिकेतील 'गौरी' ची भूमिका चाहत्यांनी खूप आवडली होती. यानंतर ती 'परफेक्ट पाटी', 'गुलमोहर' आणि 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेत दिसली. यासोबत तिने अनेक चित्रपटातदेखील काम केलं आहे. तर सायली सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news