सई ताम्हणकर : इंडिया लॉकडाऊन चित्रपटाचे पोस्टर रिलीज

India lockdown movie
India lockdown movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट इंडिया लॉकडाऊनचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. कोविड-१९ वर आधारित चित्रपट मधुर भांडारकर दिग्दर्शित आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

सई ताम्हणकरने पेट पुराण, बी. ई. असे अनेक प्रोजेक्ट्स देऊन मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वतःचे नाव कोरले आहे. रोजगार, मीडियम स्पाइसी आणि इतर प्रोजेक्ट्स. सई 'सोलो' आणि 'नवरसा' सारख्या अनेक यशस्वी बहु-भाषिक चित्रपटांचा भाग आहे. 'मिमी'मधील तिच्या सहाय्यक भूमिकेसाठी तिची प्रचंड प्रशंसा केली गेली आहे. ती सध्या तिचा पुढचा चित्रपट 'इंडिया लॉकडाऊन'च्या रोमांचक रिलीजची तयारी करत आहे. ज्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर आले आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी कोविड-१९ वर आधारित चित्रपटासाठी अभिनेत्रीला महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. अभिनेत्रीची अष्टपैलू कामगिरी विविध भाषा आणि शैलींमधून येते. 'इंडिया लॉकडाऊन'मुळे ती नवीन 'मधुर भांडारकर हिरोईन' बनली आहे. विविध विषयांवरील तिच्या चित्रपटांसाठी प्रचंड कौतुक आणि पुरस्कार प्राप्त करणारी ही बहुभाषिक स्टार मधुर भांडारकरच्या पुढील चित्रपटात तिची आणखी एक बहुमुखी छटा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

अभिनेत्री सईने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले – "तुम्हाला माहित असलेली शोकांतिका, तुम्हाला माहीत नसलेल्या न सांगतलेल्या कथा! #IndiaLockdown प्रीमियर २ डिसेंबरला.

इंडिया लॉकडाउनमध्ये सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा, प्रकाश बेलावाडी आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले असून पेन स्टुडिओ आणि पीजे मोशन पिक्चर्स यांनी निर्मिती केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news