Priyanka Chopra : ‘ती आता इंडियन दिसत नाही,’ प्रियांका चोप्राला पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस (Video) | पुढारी

Priyanka Chopra : 'ती आता इंडियन दिसत नाही,' प्रियांका चोप्राला पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसी गर्ल प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतात परतलीय. आल्याबरोबर तिने सोशल मीडियावर मोरबी पुल दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केसं. यासोबतच तिने सोशल मीडियावरही आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रियांका (Priyanka Chopra) परत आल्यापासून मीडियाचे कॅमेरे तिच्यावर आहेत. अलीकडेच प्रियांका फुल स्वॅगसह ऑल व्हाईट लूकमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर तिच्या या लूकमधील फोटो पाहायला मिळतात. तिचा एक व्हिडिओदेखील पाहायला मिळतोय. प्रियांकाची ही स्टाईल पाहून नेटिझन्स म्हणताहेत की, ही इंडियन नव्हे तर हॉलिवूडची दिवा दिसतेय. (Priyanka Chopra)

इन्स्टाग्रामवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, प्रियांका ऑफ-व्हाईट कलरच्या क्रॉप टॉप आणि त्याच रंगाच्या रुंद लेग पॅंटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिचे तपकिरी केस आणि डोळ्यांवरील सनग्लासेस लुकमध्ये भर घालत आहेत. प्रियांका तिच्या कारमधून खाली उतरताना पापाराझींसाठी पोझ देत आहे. प्रियांकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटिझन्स तिला विदेशी म्हणत आहेत.

अशा प्रतिक्रिया दिल्या…

प्रियांकाचा व्हिडिओ पोस्ट करत एका चाहत्याने लिहिले की, ‘ती आता भारतीय दिसत नाही’. त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘आता ती हॉलिवूड दिवा दिसते आहे’. प्रियांकाचे कौतुक करताना एका चाहत्याने लिहिले, सुपर स्टनिंग देसी गर्ल.

प्रियांकाचा एअरपोर्ट लूकही खूप व्हायरल झाला होता. प्रियांका ऑल डेनिम लूकमध्ये अप्रतिम दिसत होती. तिचा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्याचबरोबर मुंबईत आल्यानंतर प्रियांकाने सोशल मीडियावर अनेक फोटोही शेअर केले आहेत.

twitter – Viral Bhayani

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Back to top button