प्रसिद्ध मल्याळम कवी आणि लेखक टी पी राजीवन यांचे निधन | पुढारी

प्रसिद्ध मल्याळम कवी आणि लेखक टी पी राजीवन यांचे निधन

कोझीकोड : प्रसिद्ध कवी आणि लेखक टी पी राजीवन यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. २ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना यकृत आणि किडनी संबंधित आजार होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना राजीवन यांचे निधन झाले.

थाचोम पोयिल राजीवन असे त्यांचे नाव असून टीपी राजीवन नावानेही त्यांना ओळखले जाते. एक भारतीय कादंबरीकार आणि कवी म्हणून त्यांची ओळख होती. ते मल्याळम आणि इंग्रजी भाषेत लिहायचे. मल्याळममध्ये, त्यांनी दोन कादंबरी प्रकाशित केले. एक प्रवास वृत्तांत, काव्य संग्रह, निबंध संग्रहही त्यांच्या नावावर आहे.

Back to top button