पुढारी ऑनलाईन डेस्क : १०० कोटींची खंडणी वसुली, मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे सध्या कोठडीत आहेत. या प्रकरणात वाझे हे तळोजा तुरूगांत आहेत. दरम्यान, त्यांनी तुरूंगातील एका मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी त्यांनी NIA तपास यंत्रणेच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मांजरीच्या पिल्ल्याला ते लाडाने 'झुमका' असे म्हणतात. या संदर्भातील वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' ने दिले आहे. (Sachin Waze)
मनी लॉड्रिंग प्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हे सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. या ठिकाणाहून त्यांनी एक याचिका दाखल केली आहे. या दोन पानी हस्तलिखित याचिकेत म्हटले आहे की, तुरुंगातील कोठडीत राहणारे मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्याची मला परवानगी हवी आहे. तसेच मांजरीच्या पिल्ल्याच्या चांगल्या काळजीसाठी त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करावे लागेल, असेही त्यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे. (Sachin Waze)
वाझे यांनी न्यायालयाला मांजर दत्तक घेण्यासाठी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तुरूंगातील मांजरीचे पिल्ले ज्या ठिकाणी आहे, तिथे सध्या कचरा टाकला जातो. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील एका गाण्यावरून या मांजरीच्या पिल्ल्याला 'झुमका' असे नाव दिले आहे, तसेच हे मांजरीचे पिल्लू सध्या कमकुवत असल्याचे त्याला उत्तम काळजीची गरज आहे, पण तुरूंगात हे शक्य नाही. त्यामुळे या मांजरीचे पिल्लू दत्तक घेऊन त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवायचे आहे, असे बडतर्फ पोलिस अधिकारी वाझे यांनी म्हटले आहे. (Sachin Waze)
आपण हा प्राणीप्रेमी आहे आणि त्यांनी याआधी कुत्रे आणि मांजरांना दत्तक घेतले आहे आणि कुटुंबाने त्याची योग्य काळजी घेतली आहे," असेही याचिकेत म्हटले आहे.