पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अँटिलिया बॉम्ब प्रकरणाच्या संदर्भात यूएपीए अंतर्गत खटला चालवण्याच्या मंजुरीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका आज (दि.७) फेटाळून लावली. सचिन वाझे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. तसेच खटला चालवण्यास दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. नंतर झालेल्या चौकशीत पार्क केलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ५ मार्चला ते मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.
आरोपी प्रदीप शर्मा यांच्या इतर आरोपींसमवेत कट रचण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये बैठका झाल्याचे एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मनसूख हिरेन यांची हत्या करण्यासाठी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?