sachin waze : सचिन वाझेच्या कोठडीत पुन्हा वाढ | पुढारी

sachin waze : सचिन वाझेच्या कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई, पुढारी ऑनलाईन :

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं भरलेली गाडी ठेवल्याचा आरोप असणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या (sachin waze) पोलीस कोठडीत आणखी वाढ झाली आहे. अधिक तपासासाठी वाझेच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. (sachin waze)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं भरलेली गाडी ठेवल्याचा तसेच संबंधित गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप असणारे निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाकडून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. सचिन वाझेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची गरज असल्याचे पोलीसांचे म्हणणे होते. त्यानुसार त्यांनी न्यायालयातही मागणी केली होती. पोलीसांची ही मागणी मान्य करत सचिन वाझेची पोलीस कोठडी वाढवली आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता सचिन वाझेचा 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. एनआयएकडून वाझेचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेनं न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा या विभागाला देण्यात आला होता.

हे ही वाचा :

Back to top button