युद्धभूमीवरील प्रेमाची भारतात ‘सप्तपदी’! रशिया- युक्रेन जोडप्याचा दिमाखात पार पडला विवाह सोहळा

युद्धभूमीवरील प्रेमाची भारतात ‘सप्तपदी’! रशिया- युक्रेन जोडप्याचा दिमाखात पार पडला विवाह सोहळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन यांच्यात (Russia-Ukraine war) गेल्या पाच महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात नागरिकांसह शेकडो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः युक्रेनमध्ये मालमत्तेसह मोठी जीवितहानी झाली आहे. दोन्ही देशांतील संघर्षात युक्रेनमधील लाखो संख्येने लोकांनी आजूबाजूच्या देशांत आश्रय घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये तिरस्काराची भावना आहे. या तिरस्काराच्या वातावरणातून दूर रशिया आणि युक्रेनच्या एका प्रेमी कपलने भारतात येऊन प्रेमाचा संदेश दिला आहे. दोघे भारतात येऊन लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, रशियाचा सर्गेई नोविकोव्ह (Sergei Novikov) याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील दिव्या आश्रमात त्याची युक्रेनची प्रेयसी एलोना ब्रामोका (Elona Bramoka) हिच्यासोबत सात फेरे घेतले. सर्गेई नोविकोव्ह हा रशियन वंशाचा इस्रायली नागरिक आहे. सर्गेई आणि त्याची युक्रेनियन प्रेयसी एलोना हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लग्नासाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे शांत शहर निवडले. स्थानिक लोकांनी या जोडप्याला लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी आनंदाने मदतीचा हात पुढे केला. या जोडप्याने सनातन धर्म आणि हिंदू रितिरिवाजानुसार लग्न केले. लग्न सोहळ्यात स्थानिक लोकांनी पारंपरिक हिमाचलमधील लोक संगीतावर नृत्य केले. लग्नात बँड बाजा वरात सगळे काही होते.

आश्रमाचे पंडित संदीप शर्मा यांनी सांगितले की "सर्गेई आणि एलोना धर्मशाळेजवळील धरमकोट येथे एका कुटुंबासोबत गेल्या एक वर्षापासून राहत आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाची सर्व व्यवस्था केली होती. आमच्या आश्रमातील पंडित रमण शर्मा यांनी संस्कृत स्तोत्रांचे पठण केले आणि त्यांचा विवाह सोहळा पार पाडला."

यजमान विनोद शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कन्यादान विधी पार पाडला. नववधू एलोना भारतीय पारंपरिक पोशाखात खूप सुंदर दिसत होती.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news