युक्रेनच्या ओडेसा शहरावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला | पुढारी

युक्रेनच्या ओडेसा शहरावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला

कीव्ह  ; वृत्तसंस्था : पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न संकट निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमी या दोन्ही देशांना धान्य निर्यात करार केला. पण त्यानंतर 12 तासांतच रशियाने युक्रेनच्या ओडेसा शहरावर तीव्र क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

धान्य निर्यात करारानुसार रशिया युक्रेनच्या बंदरांवर हल्ला करणार नाही, असे ठरले होते. तरीही ओडेसातील एक बंदरावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेन गव्हाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. याशिवाय इतर धान्ये, खाद्य तेल आणि बीयांचीही निर्यात युक्रेन करतो. ओडेसातील बंदरातून निर्यात करण्यात येणार्‍या मालाची चढाई केली जात असते.

धान्य जहाजामध्ये भरले जात असतानाच रशियाने हा हल्ला केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, हा रशियाचा क्रूर चेहरा आहे. रशिया जी आश्वासने देतो, ती पाळत नाही, हे दिसून येते. रशियावर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ, ब्रिटन, जर्मनी, इटली या देशींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

करारात काय ठरले होते?

बंदरांवर हल्ला न करण्यासह, तुर्की आणि संयुक्त राष्ट्र जहाजांचे निरीक्षण करतील, रशियन शस्त्रे तर युक्रेनमध्ये पाठवली जात नाहीत ना याची खात्री ते करतील. तसेच काळ्या समुद्रातील निर्यातीसाठी सज्ज असलेल्या धान्याची जहाजांनी तिथून तत्काळ निघावे, असे धान्य निर्यात करारात ठरले होते.

Back to top button