Russia-Ukraine War : लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच युक्रेनचं नवदाम्पत्य गेले देशाच्या रक्षणासाठी 

RussiaUkraineWar
RussiaUkraineWar
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या सुरु आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत, हा फोटो युक्रेनमधील २१ वर्षीय  यारीना आणि २४ वर्षीय स्वियाटोस्लाव यांचा आहे. ज्या दिवशी (बुधवार, दि. २३ फेब्रुवारी) रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी यारीना आणि स्वियाटोस्लाव विवाहबद्ध झाले आहेत. दोघेही आज युक्रेनच्या रक्षणार्थ शस्त्र उचलण्याच्या आवाहनात सामील झाले आहेत. त्यांचा हा फोटो सोशल माडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. जगभरातून युक्रेनवासीयांसाठी आणि यारीना व स्वियाटोस्लाव यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली जात आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आणि जो कोणी या वादात हस्तक्षेप करेल त्यांची खैर नाही अशी धमकीवजा इशारा दिला. युक्रेनमध्ये रशियाने आपल्या फौजा घुसवल्या असून, शहरांवर आणि लष्करी तळांवर एअरस्ट्राईक करत आहेत. बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ले, मोठमोठ्याने वाजणारे सायरन अशा वातावरणातून रशियन फौजांनी सर्वसामान्य युक्रेनवासीयांवर दहशत बसवली आहे. युक्रेनवासीयांनी राहत्या घराच्या खाेल्याही बॉम्बहल्ल्यापासून संरक्षणार्थ शेल्टर रूम बनवून घेतल्या आहेत. सब-वे आणि बंकरमध्ये राहणार्‍या नागरिकांचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मन हेलावून टाकणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Russia-Ukraine War)
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यापासून आतापर्यंत १३७ युक्रेनियन सैनिक आणि नागरिक मृत झाले आहेत. तर  ३१६ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news